बुधवार, 28 अक्टूबर 2026
ब्रेकिंग न्यूज

दुष्काळाचे ५ हजार थेट बँक खात्यात जमा होणार! कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय, बँकांना स्पष्ट निर्देश

महाराष्ट्र

दुष्काळाचे ५ हजार थेट बँक खात्यात जमा होणार! कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय, बँकांना स्पष्ट निर्देश

Rushikesh Gangurde
Rushikesh Gangurde

Wegwan News Reporter

3 min read 1,335 views 0 comments

Published: 27 October 2026 IST

Updated: 27 October 2026 IST

हा लेख शेअर करा:

दुष्काळाचे ५ हजार थेट बँक खात्यात जमा होणार! कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय, बँकांना स्पष्ट निर्देश

📰 Google News वर फॉलो करा!

ताज्या बातम्या त्वरित मिळवा - Wegwan News

मुंबई / ऋषिकेश गांगुर्डे : यंदा पाऊसपाणी व्यवस्थित न झाल्यामुळे आणि दुष्काळाच्या संकटाने महाराष्ट्रातील बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशातच राज्य सरकारने या संकटात सापडलेल्या बळीराजाला आधार देण्यासाठी एक अत्यंत दिलासादायक पाऊल उचललं आहे. दुष्काळाने बाधित झालेल्या राज्यातील तब्बल दीड कोटी शेतकऱ्यांना आता थेट बँक खात्यात आर्थिक मदत मिळणार आहे.

विशेष म्हणजे, ही कोणतीही उशिरा मिळणारी मदत नसून थेट ५ हजार रुपयांची अग्रिम रक्कम (Advance Amount) गुरुवापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी सरकार तब्बल ७,५०० कोटी रुपयांचा मोठा खर्च करणार आहे. बँकांनी या रकमेतून जुने कर्ज किंवा इतर कारणांसाठी कपात करू नये, असे सक्त निर्देशही देण्यात आले आहेत.

जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी शेतकरी असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत नेमके काय ठरले? दीड कोटी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या मदतीचे पैसे खात्यात कधी जमा होणार? आणि बँकांच्या मनमानी कारभारावर सरकारने काय कडक भूमिका घेतली आहे? याची सविस्तर माहिती आपण खाली पाहणार आहोत.

राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; गुरुवापर्यंत पैसे जमा होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळी परिस्थितीवर सखोल चर्चा करण्यात आली. दुष्काळामुळे अक्षरशः कोलमडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक हातभार लागावा, यासाठी राज्य सरकारने तातडीची पावलं उचलली आहेत.

  • कधीपर्यंत जमा होणार रक्कम? मंत्रिमंडळाच्या निर्देशानुसार, पात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात गुरुवारपर्यंत ही ५ हजार रुपयांची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल.

  • दीड कोटी शेतकऱ्यांना लाभ: या योजनेमुळे राज्यातील सुमारे १ कोटी ५० लाख शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार असून, या संपूर्ण प्रक्रियेसाठी राज्य सरकार तिजोरीतून तब्बल ७,५०० कोटी रुपयांचा निधी खर्च करणार आहे.

dushkal madat

बँकांना सक्त ताकीद: मदतीचे पैसे कुणीही कापून घेणार नाही!

बऱ्याचदा सरकारी मदत खात्यात जमा झाल्यानंतर बँका ती जुन्या कर्जाच्या वसुलीसाठी किंवा इतर कारणांसाठी कापून घेतात, असा मोठा अनुभव शेतकऱ्यांना येतो. पण यंदा मुख्यमंत्र्यांनी यात विशेष लक्ष घातले आहे.

मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश: शेतकऱ्यांना मिळणारी ही ५ हजार रुपयांची मदत पूर्णपणे त्यांच्या हातात (खात्यात) मिळायला हवी. कोणतीही बँक या रकमेतून जुनी थकबाकी किंवा कर्जाचे हफ्ते म्हणून पैसे वजा करणार नाही, याची खबरदारी घेण्याचे कडक निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

बळीराजाला मोठा दिलासा

ऐन संकटाच्या काळात मिळालेला हा अग्रिम निधी शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर किंवा दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मोठा आधार देणारा ठरणार आहे. यंत्रणेने युद्धपातळीवर काम सुरू केले असून, येत्या काही दिवसांतच हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या हातात पोहोचेल.

महत्त्वाची टीप (Author & Publisher Trust Note):

ही बातमी आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील अधिकृत माहिती आणि शासकीय सूत्रांकडून मिळालेल्या अपडेट्सच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. शेतीविषयक आणि शासनाच्या अशाच नवनवीन योजनांच्या अचूक माहितीसाठी आमच्या पोर्टलला नियमित भेट देत राहा.

📢 Join Our Community

Stay updated with latest auto news, exclusive insights, and special offers!

Tags:#Maharashtra Cabinet Meeting#दुककाळ मदत#मराठी बातम्या#मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस#शेतकरी अग्रिम मदत

लेखक बद्दल

Rushikesh Gangurde
Rushikesh Gangurde

ऋषिकेश गांगुर्डे ( Rushikesh Gangurde ) हे Wegwan News™ चे उपसंपादक असून त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील १७ वर्षांहून अधिक काळाचा प्रदीर्घ अनुभव आहे. गेल्या १६ वर्षांपासून ते Wegwan News च्या मुख्य संपादकीय मंडळाचे नेतृत्व करत आहेत. ऑटोमोबाईल (नवीन कार, बाईक्स, EV) आणि सोलर एनर्जी (सौर ऊर्जा योजना) हे त्यांचे मुख्य अभ्यासाचे विषय आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील राजकारण, न्यायालयीन घडामोडी, देश-विदेश आणि बिझनेस विश्वातील गुंतागुंतीच्या मुद्द्यांवर त्यांचे सखोल आणि निष्पक्ष विश्लेषण वाचकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. उच्च दर्जाची व्यावसायिकता आणि सत्यशोधक पत्रकारितेचा वारसा जपून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपली भक्कम पकड निर्माण केली आहे.

→ लेखकाची संपूर्ण प्रोफाइल पहा

कमेंट्स (0)

तुमचे मत नोंदवा

कमेंट्स लोड होत आहेत...

पुढील बातम्या