देश-विदेश

आता कसं जगायचं, घरगुती गॅस महागला, एका सिलिंडरसाठी मोजावे लागणार एवढे पैसे…

आता कसं जगायचं, घरगुती गॅस महागला, एका सिलिंडरसाठी मोजावे लागणार एवढे पैसे...

मुंबई : घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा एकदा महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.देशात महागाई (Inflation) उच्च स्थरावर पोहोचली आहे.पेट्रोल, डिझेलच्या दरापासून ते खाद्य तेलापर्यंत आणि अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वांंच्याच दरात मोठी वाढ पहायला मिळत आहे.

वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीमध्ये आता महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे आजपासून घरगुती सिलिंडरची किंमत ९९९.५० रुपये असणार आहे.

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच जनता हैराण असतानाच सिलिंडरच्या दरात ही वाढ झाली आहे. एलपीजीच्या दरवाढीमुळे भारतातील सर्वसामान्यांच्या त्रासात भर पडणार आहे.

पन्नास रुपयांच्या वाढीसह घरगुती सिलिंडरचे (cylinder) दर आता 999.50 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच इथून पुढे एका सिलिंडरसाठी  हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सिलिंडरचे दर महागल्याने गृहिनीचे बजेट कोलमडण्याची शक्यात आहे.

एक मे रोजी व्यवसायिक सिलिंडरचे दर वाढवण्यात आले होते. व्यवसायिक सिलिंडर पाठपाठ आता घरगुती गॅसच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे.

याआधी व्यावसायिक सिलिंडर ( Commericial LPG Cylinder ) महाग झाला होता. याआधी व्‍यावसायिक सिलिंडरच्‍या किंमती १०२ रुपयांनी वाढल्‍या होत्या. एप्रिल महिन्‍यात या किंमतीमध्‍ये २६८ रुपयांनी वाढ झाली होती. त्यात पुन्हा मे महिन्याच्या सुरुवातीला त्यात वाढ झाली होती.

एकीकडे व्‍यावसायिक सिलिंडरच्‍या किंमती वाढल्‍या असताना आता घरगुती सिलिंडरच्‍या किंमतीमध्‍ये वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींचे घरगुती बजेट कोलमडले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. १ मे रोजी, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १०२.५० रुपयांनी वाढून२३५५.५० रुपये झाली, जी पूर्वी २२५३ रुपये होती.

तसेच, ५ किलोच्या एलपीजी व्यावसायिक सिलिंडरची किंमत ६५५ रुपये करण्यात आली आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button