Uncategorized

एलआयसी ऑफिसला लागली आग, कॉम्प्युटरसह महत्वाचे दस्ताऐवज जळाल्याची भीती

एलआयसी ऑफिसला लागली आग, कॉम्प्युटरसह महत्वाचे दस्ताऐवज जळाल्याची भीती

मुंबई – विलेपार्ले पश्चिम येथे नानावटी हॉस्पिटल समोरील स्वामी विवेकानंद मार्गावर असलेल्या एलआयसी कार्यालयला आग लागली आहे. विलेपार्ले (Vileparle) पश्चिमेच्या एलआयसी (LIC) ऑफिसला सकाळी सात वाजता अचानक आग लागल्याने गोंदळ उडाला.

आग लागल्याची माहिती मिळताच पोलिस आणि अग्नीशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगलेल्या आग लेवल २ ची आहे. सध्या तिथे फायर ब्रिगेडच्या आठ गाड्या पोहोचल्या असून आग विझवण्याचा अथक प्रयत्न करीत आहेत.

तसेच घटनास्थळी पोलिसांनी (Police) कडक बंदोवस्त ठेवला आहे. काही महत्त्वाचे दस्ताऐवज जळाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

नेमकी आग कुठे लागली ? धुरांचे लोट

ग्राउंड आणि वरच्या दोन मजल्यांच्या LIC ऑफिस इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. दुसऱ्या मजल्यावरील कॉमन पॅसेजवर धुराचे लोट पसरल्याचे दिसत आहे.

सकाळी अचानक आग लागल्याने परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अग्नीशामक दलाच्या आठ गाड्या आग विझवण्याचं काम करीत आहेत.

आगीत अनेक वस्तू जळाल्याची भीती…

ग्राउंड आणि वरच्या दोन मजल्यांच्या LIC ऑफिस इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पगार बचत योजना विभाग आहे.

तिथल्या इलेक्ट्रिक वायरिंग, इन्स्टॉलेशन, कॉम्प्युटर, फाइल रेकॉर्ड, लाकडी फर्निचर इत्यादी वस्तूंना आग लागली आहे. अजूनही आग आटोक्यात आली नाही. पोलिस व अग्नीशामक दलाचे पथक आग विझवण्यासाठी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button