देश-विदेश

रक्षाबंधनाला मोठा दिलासा ! गॅस सिलिंडर एवढ्या रुपयांनी स्वस्त, पहा किती रुपयांना मिळणार गॅस सिलेंडर

रक्षाबंधनाला मोठा दिलासा ! गॅस सिलिंडर एवढ्या रुपयांनी स्वस्त

मुंबई : महागाईने हैराण झालेल्या जनतेला केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची (एलपीजी किंमत) 200 रुपयांपर्यंत कपात केली आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर सरकारने 200 रुपये सबसिडी जाहीर केली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना हे अनुदान दिले जाणार आहे. पहिल्या ऑगस्टला पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची कपात केली होती. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

LPG च्या सध्याच्या किमती ( raksha Bandhan offer )

Whatsapp Group Join
Telegram channel Join

ऑगस्टच्या पहिल्या तारखेला राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये होती. त्याच वेळी, एलपीजी सिलेंडरची किंमत मुंबईत 1102.50 रुपये, कोलकातामध्ये 1129 रुपये आणि चेन्नईमध्ये 1118.50 रुपये होती. पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमती बदलतात.

मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला निर्णय raksha Bandhan  relief on gas cylinder

Whatsapp Group Join
Telegram channel Join

सरकारच्या म्हणण्यानुसार, उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी स्वस्त होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदानाचा लाभ केवळ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाच मिळणार असल्याचे केंद्र सरकारने गेल्या वर्षीच स्पष्ट केले होते. इतर कोणालाही स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर सबसिडी दिली जाणार नाही. उज्ज्वला योजनेंतर्गत, सरकार आधीपासून 200 रुपये अनुदान देत होते, आता 200 रुपये अतिरिक्त अनुदान मिळणार आहे.

12 एलपीजी सिलिंडरवर सबसिडी

उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी एका वर्षात एकूण 12 स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर सबसिडी घेऊ शकतात. 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली. या अंतर्गत सरकार दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांना LPG कनेक्शन मोफत देते.

सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक एलपीजी कनेक्शनशी लिंक करावा लागेल. सबसिडीचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधार गॅस कनेक्शनशी जोडलेले असणे आवश्यक आहे. 14.2 किलो एलपीजी सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी मिळते. मार्च 2023 पर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार, सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत 9 कोटीहून अधिक मोफत स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शनचे वितरण केले आहे.

पेट्रोलियम कंपन्या 14.2 किलो घरगुती आणि 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित करतात. देशात 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत शेवटचा बदल 1 मार्च 2023 रोजी झाला होता.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button