लासलगाव बाजार समितीत कांद्यासह कडधान्यांचे जाणून घ्या बाजार भाव, 12 मार्च 2026
लासलगाव बाजार समितीत कांद्यासह कडधान्यांचे जाणून घ्या बाजार भाव, 12 मार्च 2026

लासलगाव : आशिया खंडातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (१२ मार्च) कांदा आणि इतर शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणात झाली. उन्हाळ कांद्याला सरासरी ११६० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असून, लाल कांद्याला जास्तीत जास्त १३६० रु. दर मिळाला आहे.
बाजार समितीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, आज विविध शेतीमालाचे दर खालीलप्रमाणे राहिले:
कांदा बाजारभाव (प्रति क्विंटल)
लाल कांदा: किमान ४०० रु., कमाल १३६० रु., सरासरी ९२५ रु.
उन्हाळ कांदा: किमान ८०० रु., कमाल १३०१ रु., सरासरी ११६० रु.

धान्य व कडधान्य दर
कांद्यासोबतच सोयाबीन, गडू आणि हरभरा यांच्या दरातही चढ-उतार पाहायला मिळाले:
सोयाबीन: किमान २५०० रु. ते कमाल ५७३० रु. (सरासरी ५६८० रु.)
गहू: किमान २१०० रु. ते कमाल २३२६ रु. (सरासरी २२७० रु.)
मका (व्यापारी): सरासरी १७६० रु.
हरभरा (डॉलर): कमाल ६५०० रु. (सरासरी ५९०१ रु.)
तूर: किमान ५००० रु. ते कमाल ६८०० रु. (सरासरी ६७०० रु.)
इतर शेतीमाल
मुग: ४००० रु. (स्थिर)
मेथी: सरासरी ५००० रु.
धने: सरासरी १०,००० रु.
चिंच (अखंड): २७०१ रु.
बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, शेतीमालाची विक्री केल्यानंतर देय रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात घ्यावी. पेमेंटबाबत काही तक्रार असल्यास २४ तासांच्या आत बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा