महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल या दिवशी जाहीर होणार, डिजीलॉकरवर ‘Coming Soon’ चे संकेत; निकाल पाहण्यासाठी ‘हे’ डिटेल्स पहा
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल या दिवशी जाहीर होणार, डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स पहा

मुंबई – maharashtra hsc result 2026 date : महाराष्ट्रातील बारावीचा निकालाबाबत मोठी अपडेट म्हणावे लागेल. 2026 महाराष्ट्र बोर्ड १२ वी निकाल लागण्याची संकेत मिळत आहे. १२ चा रिझल्ट डिजीलॉकरवर लवकरच जाहीर होणार असल्याचे माहिती मिळत आहे. आता लवकरच मे महिन्याच्या सुरुवातीला निकाल लागण्याची शक्यता असून निकाल पाहण्याची लिंक आणि पद्धत सोप्या भाषेत जाणून घेऊया .
कोणत्याही क्षणी महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल ! डिजीलॉकरवर लागणार
डिजीलॉकरवर ‘Coming Soon’ चे संकेत; आपल्याला निकाल पाहण्यासाठी ‘हे’ डिटेल्स ठेवा… महाराष्ट्रात यंदा १४ लाखांहून अधिक विद्यार्थी बारावी परीक्षेसाठी बसले होते, या १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे.

या बाबत डिजीलॉकरच्या अधिकृत वेबसाईटवर “Class 12th Result 2026 Coming Soon” असा मेसेज दिसून येत आहे , याचा नेमका अर्थ असा होतो की निकाल प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. साधारणपणे निकाल जाहीर होण्यापूर्वी अशी अपडेट तांत्रिक पडताळणीसाठी दिली जाते.
निकालाची संभाव्य तारीख आणि वेळ
विविध सूत्रांनुसार, चालू अपडेट नुसार निकाल मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निकाल लागण्याची दाट शक्यता आहे काही रिपोर्ट्सनुसार १३ मे ते २५ मे दरम्यान निकाल लागू शकतो. बोर्डाचा निकाल साधारणपणे दुपारी १:०० वाजता ऑनलाईन उपलब्ध होतो.
निकाल ऑनलाइन कसा तपासायचा?
निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थी खालील अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचे गुण पाहू शकतात.
१. results.digilocker.gov.in
२. hscresult.mkcl.org
३. mahresult.nic.in
४. mahahsscboard.in from Marathi
निकाल पाहण्यासाठी काय आवश्यक आहे?
विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी खालील दोन गोष्टी तयार ठेवाव्यात. हॉल तिकीटवर असलेला आपला बैठक क्रमांक, अर्जावर नोंदवलेले आईचे नाव.
स्ट्रीम वाईज निकाल (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स)
मागील वर्षी विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.३५% लागला होता. महाराष्ट्र बोर्ड एकाच वेळी विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक शाखांचे निकाल जाहीर करणार आहे. यावर्षीही निकालाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता किती टक्के निकाल लागतो येणारा पुढचा काळच ठरणार आहे





