27 किमी मायलेज, 6 एअरबॅग्ज आणि प्रगत फिचर्स; Hyundai च्या सर्वात स्वस्त कारवर बंपर डिस्काउंट, किंमत ₹5.55 लाख
27 किमी मायलेज, 6 एअरबॅग्ज आणि प्रगत फिचर्स; Hyundai च्या सर्वात स्वस्त कारवर बंपर डिस्काउंट, किंमत ₹5.55 लाख

नवी दिल्ली : Hyundai Grand i10 NIOS Price List – जर तुम्ही दररोजच्या वापरासाठी एखादी प्रीमियम हॅचबॅक घेण्याचा विचार करत असाल, तर ह्युंदाईची सर्वात स्वस्त कार Grand i10 NIOS तुमच्यासाठी एक जबरदस्त डील ठरू शकते. फेब्रुवारी-२०२६ मध्ये या कारवर तब्बल ₹४८,००० पर्यंतचे बेनिफिट्स मिळत आहेत. यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्स्चेंज बोनस आणि कॉर्पोरेट ऑफर्सचा समावेश आहे. आनंदाची बातमी म्हणजे ही ऑफर पेट्रोल आणि CNG अशा दोन्ही व्हेरियंट्सवर उपलब्ध आहे.
Hyundai Grand i10 NIOS Price List: किती आहे किंमत?
Hyundai Grand i10 NIOS ची एक्स-शोरूम किंमत फक्त ₹५.५५ लाखांपासून सुरू होते, जी टॉप मॉडेलसाठी ₹७.९१ लाखांपर्यंत जाते. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही पावरट्रेन ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल.
| व्हेरियंट | इंजिन / फ्यूल | ट्रान्समिशन | एक्स-शोरूम किंमत |
| Era | 1.2 Kappa Petrol | Manual | ₹ ५,५५,००० |
| Magna | 1.2 Kappa Petrol | Manual | ₹ ६,२८,००० |
| Corporate | 1.2 Petrol | Manual | ₹ ६,५१,००० |
| Sportz | 1.2 Kappa Petrol | Manual | ₹ ६,८३,५०० |
| Magna AMT | 1.2 Kappa Petrol | Automatic | ₹ ६,८५,०३५ |
| Sportz DT | 1.2 Kappa Petrol | Manual | ₹ ७,०१,५०० |
| Sportz (O) | 1.2 Petrol | Manual | ₹ ७,०८,५०० |
| Corporate AMT | 1.2 Petrol | Automatic | ₹ ७,१२,००० |
| Sportz AMT | 1.2 Kappa Petrol | Automatic | ₹ ७,३५,५०० |
| Asta | 1.2 Kappa Petrol | Manual | ₹ ७,३९,७३५ |
| Sportz (O) AMT | 1.2 Petrol | Automatic | ₹ ७,६२,५०० |
| Asta AMT | 1.2 Kappa Petrol | Automatic | ₹ ७,९१,६९२ |

इंजिन आणि ट्रान्समिशन
Hyundai Grand i10 NIOS मध्ये १.२-लिटर पेट्रोल इंजिन मिळते, जे साधारण ८३ PS ची पॉवर आणि ११३.८ Nm चा टॉर्क जनरेट करते. CNG व्हेरियंटमध्ये इंजिनची पॉवर थोडी कमी होते, पण रनिंग कॉस्टच्या बाबतीत हा एक किफायतशीर पर्याय आहे. यात ५-स्पीड मॅन्युअल आणि AMT अशा दोन्ही गिअरबॉक्सचा ऑप्शन मिळतो.
किती मिळते मायलेज?
मायलेजचा विचार केला तर ही कार पेट्रोलमध्ये सुमारे २०.७ kmpl आणि CNG मध्ये जवळपास २७ km/kg चा मायलेज देते. सिटी ड्रायव्हिंग आणि दररोजच्या रनिंगसाठी ही एक पॉकेट-फ्रेंडली कार आहे. बाजारात तिची थेट स्पर्धा Maruti Swift आणि Tata Tiago शी आहे.
फीचर्स आणि सोयीसुविधा
Grand i10 NIOS मध्ये ८-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसोबत अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले सपोर्ट, वायरलेस चार्जिंग, रिअर AC वेंट्स, की-लेस एन्ट्री आणि क्रूझ कंट्रोल सारखे मॉडर्न फीचर्स मिळतात. केबिन स्पेसियस असून ड्युअल-सिलेंडर सीएनजी टेक्नॉलॉजीमुळे यात बूट स्पेस (डिक्कीत जागा) देखील चांगली मिळते.
सेफ्टी फीचर्स
सुरक्षेच्या बाबतीत ह्युंदाईने कोणतीही तडजोड केलेली नाही. या कारच्या सर्व व्हेरियंटमध्ये ६ एअरबॅग्स स्टँडर्ड (Standard) आहेत. याशिवाय ABS सह EBD, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल होल्ड असिस्ट, रिअर पार्किंग सेन्सर्स आणि TPMS सारखे महत्त्वाचे फीचर्स मिळतात.
एकंदरीत पाहता, ₹४८,००० च्या बेनिफिट्ससह Hyundai Grand i10 NIOS या वेळी मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक फिचर-लोडेड आणि सुरक्षित हॅचबॅक म्हणून समोर आली आहे.





