गरीबाचं चंगळ, 6.49 लाखात मिळतेय इलेक्ट्रिक कार, एका चार्जमध्ये धावणार 468 किलोमीटर
गरीबाचं चंगळ, 6.49 लाखात मिळतेय इलेक्ट्रिक कार, एका चार्जमध्ये धावणार 468 किलोमीटर

नवी दिल्ली : आता गरिबाचंबी कारचं स्वप्न पूर्ण होणार हाय, कारण मार्केटमध्ये सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक गाडीची हवा सुरू झालीय. टाटा मोटर्सनं आपली लाडकी ‘टाटा पंच ईव्ही’ (Tata Punch EV) नव्या रूपात बाजारात उतरवली असून, तिची डिलिव्हरी आता धडाक्यात सुरू झालीय. ज्यांना बजेटमध्ये राहून कडक गाडी घ्यायची हाय, त्यांच्यासाठी हा विषय एकदम ‘नादखुळा’ ठरणार हाय.
काय हाय गाडीत खास?
या नव्या मॉडेलमध्ये कंपनीनं लूकवर लै भारी काम केलंय. जुनी काळी पट्टी काढून आता गाडीच्या रंगाचंच पॅनल दिलंय, त्यामुळं गाडी एकदम ‘फ्युचरिस्टिक’ आणि रांगडी दिसतीय. ह्येच नाही, तर नव्या नॅक्सॉन आणि हॅरियरसारखे ‘कनेक्टेड DRLs’ देऊन गाडीचा चेहरामोहराच बदलून टाकलाय. रात्रीच्या वेळी ही गाडी रस्त्यावरून जाताना समोरच्याची नजर हटणार नाही, इतकी कडक दिसती.
बॅटरीचा राडा आणि रेंजचा कडा
गाडीत टाटाने दोन पर्याय दिलेत:

१. ३० kWh बॅटरी: शहरातल्या शहरात हिंडायला एकदम टकाटक.
२. ४० kWh बॅटरी: ज्याला लांबचा पल्ला गाठायचाय, त्याच्यासाठी ही खास बनवलीय.
कंपनी म्हणतीये की मोठ्या बॅटरीवर ही गाडी एकदा चार्ज केली की ४६८ किमी धावणार. म्हणजे एकदा चार्ज केली की गाव गाठलं म्हणून समजा. अन चार्जिंगची बी कटकट नाही, फास्ट चार्जर लावला की अवघ्या २६ मिनिटात २० टक्क्यांवरून ८० टक्के गाडी चार्ज होती.
फीचर्स तर लैच भारी!
गाडीच्या आत बसलं की फीलच वेगळा येतोय. १०.२५ इंचाचा मोठा टचस्क्रीन, डिजिटल मीटर आणि स्टिअरिंगवर चकाकणारा टाटाचा लोगो बघून मन खुश होतंय. उन्हाळ्यात एसी तर हायच, पण आता यात व्हेंटिलेटेड सीट्स बी दिल्या आहेत, म्हणजे पाठीला घाम यायची भीती नाय.
सुरक्षेचा पहारा
टाटा म्हणजे सुरक्षा हे तर सांगायलाच नको. ६ एअरबॅग्ज, ३६०-डिग्री कॅमेरा (गाडीच्या भोवती काय चाललंय सगळं दिसतं), आणि डोंगराळ भागात गाडी मागं सरकू नये म्हणून ‘हिल होल्ड असिस्ट’ दिलंय. घाटमाथ्यावर गाडी चालवताना आता टेन्शन घ्यायची गरज नाय.
खिशाला परवडणारी किंमत
या नव्या कोऱ्या पंच ईव्हीची सुरुवातीची किंमत ९.६९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होतीय. फिचर्स आणि रेंजचा विचार केला, तर सध्या मार्केटमध्ये या गाडीला तोड नाही.





