MaharashtraTrending News

आता घरबसल्या भरा लाडकी बहिण योजनेचा अर्ज, येथून करा अर्ज डाऊनलोड

आता घरबसल्या करा लाडकी बहिण योजनेचा अर्ज, येथे करा अर्ज डाऊनलोड

मुंबई : Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 लाडकी बहीण योजनेची नोंदणी 1 जुलैपासून सुरु झाली आहे.यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईलसाठी लांबच्या लांब रांगा लागल्यात. त्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

या दोन्ही दाखल्यांची अट आता सरकारने शिथिल केली आहे.या नवीन लाडकी बहीण योजनेत सरकारने मोठा बदल केला असून डोमेसाईल सर्टिफिकेट ऐवजी १५ वर्ष जुनं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र देता येईल तर 2.5 लाखांच्या उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी आता पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी १५ जुलैपर्यत शेवटची तारीख होती. पण अखेर सरकारने महिलांच्या अडचणी लक्षात घेता ही तारीख ३१ ऑगस्टपर्यंत वाढवून दिली.

बघा लाडकी बहीण योजनेतील अटींमध्ये सरकारने कोणता केला बदल?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांनी प्रचंड गर्दी केली. यातील अटीशर्थीवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना काही नियम शिथिल झाल्याचं सांगितलं. वयाची मर्यादा वाढ करण्यात आली आहे, त्याशिवाय उत्पन्नाची अटही शिथिल करण्यात आली आहे.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Whatsapp Group Join
Telegram channel Join

नेमकी काय आहे लाडकी बहीण योजना

यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेतंर्गत महिलांना शासनामार्फत दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. तसेच, यासाठी पात्र अपात्रतेचे निकष लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री माझी लालकी बहीण योजनेत सात बदल कऱण्यात आले आहेत. पाहूयात काय बदल करण्यात आले आहे…

1. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे 1. रेशन कार्ड 2. मतदार ओळखपत्र 3. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 4. जन्म दाखला. या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.

२. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.1जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.01जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

३. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.

४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे.

५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे 1. जन्म दाखला 2. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 3. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.

६. रु.2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.

७. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
योजनेच्या लाभासाठी पोर्टल/ मोबाईल अॅपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल.
लाभार्थ्यांचं आधार कार्ड
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला
सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापर्यंत असणं अनिवार्क (5) बँक खातं
पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी)
पासपोर्ट आकाराचा फोटो
रेशनकार्ड
सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत पातळीपर्यंत अर्जाचा नमुना उपलब्ध करुन दिला गेला आहे. यासाठी तुमचे वय 21 वर्षे पूर्ण झालेले असावे. 65 वर्षापर्यंतच्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे. महिलांनी हा अर्ज भरुन अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचा आहे. तर तालुका पातळीवरील नगर परिषद/नगर पंचायत येथे आणि शहरात महानगरपालिकेकडे हा अर्ज जमा करायचा आहे. (Ladki bahin yojna form free download)

महिलांचा आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे हा या योजनाचा हेतू आहे. या योजनेसाठी पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. महिलेला आधार लिंक केलेल्या अकाऊंट मध्ये हे पैसे मिळणार आहेत. केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक योजनेचा जर लाभ मिळत असेल आणि तो १,५००/- पेक्षा कमी असेल तर फरकाची रक्कम दिली जाणार आहे.

अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

कोण आहे पात्र
महिला ही महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
योजनेसाठी वयाची अट २१ ते ६५ वर्ष आहे.
लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

कुटुंबातील सदस्य आयकर भरणारा असेल तर लाभ मिळणार नाही.

कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/ उपक्रम/ मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे १,५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल. कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉपोरशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत. ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

कोणते कागदपत्र आवश्यक
(१) ऑनलाईन अर्ज. (२) आधार कार्ड. (३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. (४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य). (५) बैंक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. (६) पासपोर्ट आकाराचा फोटो. (७) रेशनकार्ड. (८) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

खालील लिंकवरुन मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा फॅार्म डाऊनलोड करा

अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button