Uncategorized

तंबाखूला चुना लावण्यासाठी दिला नाही म्हणून घेतला जीव

तंबाखूला चुना लावण्यासाठी दिला नाही म्हणून घेतला जीव

कोल्हापूर : एक किंवा अनेक माणसे एकत्र आले म्हणजे तेथे वाद होणारच…

वादाचे कारणेही वेगवेगळ असते. कोणाचा पाण्यावरून तर कोणाच्या जमिनीवरून कोणाचे शाब्दिक वाद होत असतात. चक्क तंबाखूला चुना लावण्यासाठी मागितला म्हणून एकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

तसेच आपण विविध कारणाने आपण हाणामारी झाल्याचे बघितले असले किंवा ऐकले असेल. अशीच ही घटना म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

नेमक काय घडलं

Whatsapp Group Join
Telegram channel Join

तंबाखू करीता चुना मागणे एकाला चांगलेच भारी पडल्याची घटना कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील धामोड येथे येथे घडली.

तंबाखूसाठी चुना मागितल्याने एका व्यक्तीची चाकू खुपसून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अनिल रामचंद्र बारड असे या घटनेत मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

जितेंद्र खामकर आणि विकास कुंभार या दोघांकडे अनिल बारड यांनी तंबाखूसाठी चुना मागितला. चुना मागितल्यावरुन यांच्यात वाद सुरु झाला. शुल्लक कारणावरुन झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. हा वाद इतका विकोप्याला गेला कि हामाणारी सुरु असतानाच एकाने चाकू खुपसला आणि त्यात अनिल रामचंद्र बारड चा मृत्यू झाला.

या घटनेमुले परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राधानगरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button