मनोरंजन

पहिल्याच दिवशी प्रभासचा ‘राधे श्याम’ ठरला फायर, तब्बल इतक्या कोटींची कमाई…

पहिल्याच दिवशी प्रभासचा 'राधे श्याम' ठरला फायर, तब्बल इतक्या कोटींची कमाई...

नवी दिल्ली : रिबेल स्टार प्रभासचा “राधे श्याम” हा चित्रपट प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने भारतीय आणि जागतिक बाजारपेठेत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार, चित्रपटाने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा बॉक्स ऑफिसवर 28 कोटींची कमाई केली आहे.

अभिनेत्री पूजा हेगडेचा हा चित्रपटही खासकरून हिंदी प्रेक्षकांसाठी प्रदर्शित झाला होता. तर या प्रभास स्टारर रोमँटिक थ्रिलरने त्याच्या हिंदी डब व्हर्जनच्या रिलीजसह सुमारे 6 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, राधे श्यामने यूएस बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 1 मिलियन डॉलरची कमाई केली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने प्रीमियर शोमधून 891 हजार डॉलर्स कमावले आहेत. कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळसह इतर राज्यांमध्येही चांगली कामगिरी केली. प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया असूनही, चित्रपटाने भारतीय आणि जागतिक बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. काही विश्लेषकांच्या मते वीकेंड जसजसा पुढे जाईल तसतशी चित्रपटाची कमाईही वाढू शकते.

राधे श्यामने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करणे हे चांगले संकेत मानले जात आहे. आता हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द राइज’च्या बरोबरीने कमाईच्या बाबतीत पोहोचतो की नाही हे पाहायचे आहे. कारण ‘बाहुबली’ नंतर प्रभासची हिंदी पट्ट्यातही चांगली फॅन फॉलोइंग आहे.

चाहते प्रभासच्या ‘राधे श्याम’ची आतुरतेने वाट पाहत होते, अशा परिस्थितीत प्रेक्षकांनी या चित्रपटाचे बंपर बुकिंग आधीच केले आहे. ETimes च्या मते, चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्येच जगभरात करोडोंची कमाई केली आहे. ‘राधे श्याम’ने आतापर्यंत जगभरात 200 कोटींहून अधिकचा व्यवसाय केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, ज्या लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे, त्यांनी याला संमिश्र प्रतिसाद दिला आहे हेही खरे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button