गोडेतेल 20 रुपयांनी भडकले ! किराणा दुकानदारांनी साठेबाजी केल्यास कारवाई होणार…
गोडेतेल 20 रुपयांनी भडकले ! किराणा दुकानदारांनी साठेबाजी केल्यास कारवाई...

मालेगाव : रशिया – युक्रेन युद्धाच्या झळा आता संपुर्ण जगाला बसण्यास सुरुवात झाली आहे. तसेच नाशिक, मालेगावसह महाराष्ट्रात महागाईचा बार उडवल्याचे समोर येत आहे. एकीकडे निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे गोडेतेलाच्या किमतीत सध्याच लिटरमागे 20 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.अगोदरच देशात महागाईने तोंड वर काढले असताना रशिया – युक्रेनने आणखी भर पडली आहे. ( Sweet oil prices rose )
कारण खाद्य तेलाचे भाव चार दिवसांतच लिटरमागे वीस रुपयांनी महाग झाले आहेत. शेंगादाणे, करडई, सूर्यफूल, सोयाबीन या साऱ्याच तेलाच्या भावामध्ये वाढ झाली आहे. येणाऱ्या काळात गोडेतेलाचे दर अजून वाढतील, अशी शक्यता तेल व्यापारी वर्गाकडून बोललं जात आहे.
रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह मालेगावमध्ये भयंकर परिणाम जाणवत आहेत. त्याचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार आहे.
इंधन भडकण्याची भीती ( petroll price )
दरम्यान, युक्रेन-रशिया युद्धामुळे एकीकडे सोने महाग होत आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोन्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकाचा निकाल मार्च महिन्यात आहे.
या निकालाची घोषणा झाल्यानंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसे झाले, तर पुन्हा महागाई भडकेल. याचा फटका सर्वसामान्यांना बसेल.
आता गोड तेलाची साठेबाजी केल्यास कारवाई…
आता जर तुम्हाला किराणा दुकानात गोड मिळत नसेल तसेच गोडतेलाची साठेबाजी करणा-या दुकानदारांवर कारवाई होणार आहे. युक्रेन-रशिया युद्धाचा फायदा घेण्याचा प्रयत्न अनेक व्यापारी करत आहेत. अनेकांनी तेलाची साठेबाजी सुरू केल्याचे समजते. त्यामुळे बाजारपेठेत तेलाची मागणी जास्त आणि पुरवठा कमी, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. असे झाले तर येणाऱ्या काळात गोडेतेलाचे भाव अजून वाढतील. त्यामुळे कोणही साठेबाजी करू नये, असे आवाहन मालेगावचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी केले आहे. साठेबाजी रोखण्यासाठी पथकांची स्थापना करून कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.