ब्रेकिंग न्यूज : नाशिक मध्ये पावन एक्सप्रेसला भीषण अपघात… अनेक जण गंभीर जखमी…
नाशिक मध्ये पावन एक्सप्रेसला भीषण अपघात... अनेक जण गंभीर जखमी...
नाशिक : नाशिकमध्ये पवन एक्स्प्रेसचे चार डब्बे रुळावरुन घसरल्याची दुर्घटना रविवारी घडली आहे. देवळाली-लहवीत दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या लहवित
जवळ रेल्वेचे डबे लाईन तुटून पडल्याची माहिती मिळत आहे
अनेक लोक जखमी झालेले आहेत. रेल्वे पोलिस आणि आरपीएफ घटनास्थळी याठिकाणी मार्गक्रमण करीत आहे. अशी माहिती मिळत आहे.
पवन एक्सप्रेस नाशिकच्या 12 km पाहिले रुळावरून खाली उतरली आहे. काही लोक गंभीर जखमी झाले आहेत.
नाशिकजवळील लहवित – देवळाली स्थानकादरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरुन घसरल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून रेल्वे पोलिस, वैद्यकीय पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
रविवारी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास
नाशिकजवळील लहवित- देवळाली या स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर एलटीटी – जयनगर एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले. रेल्वे रुळाला तडे गेल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय, याबाबत रेल्वेकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मध्य रेल्वेने ट्विटरवर अपघाताची माहिती दिली असून यात मदत पथक घटनास्थळी रवाना झाल्याचे म्हटले आहे.
ट्रेनमधील प्रवाशांनी वृत्तवाहिन्यांना दिलल्या माहितीनुसार,
अपघातस्थळी मदत पथक अद्याप पोहोचलेले नाही.