सध्या का होतयं नुकसान… परदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे का काढतायेत?, काय आहे मोठं कारण
सध्या का होतयं नुकसान... परदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे का काढतायेत?, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली: रशिया-युक्रेन युद्धामुळे उद्भवलेल्या भू-राजकीय चिंता आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता यामुळे परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) सलग सहाव्या महिन्यात विक्री केली. भारतीय स्टॉकमधून 41,000 कोटी रुपये काढून घेतले. मार्च मध्ये एक्सचेंज. कच्च्या तेलाच्या किमती आणि चलनवाढीमुळे नजीकच्या भविष्यातही एफपीआय चलनात अस्थिरता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
रशिया-युक्रेन युद्ध आणि त्यावरुन उद्भवणारी परिस्थिती पाहता परदेशी गुंतवणूकदार आपले पैसे काढून घेतायेत. यामुळे याचा शेअर बाजारावर मोठा परिणाम दिसून येतोय. डिपॉझिटरी डेटानुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी (FPI) गेल्या महिन्यात शेअर बाजारातून 41 हजार 123 कोटी रुपये काढले आहेत. यापूर्वी त्यांनी फेब्रुवारीमध्ये शेअर बाजारातून 35 हजार 592 कोटी रुपये आणि जानेवारीत 33 हजार 303 कोटी रुपये काढले होते. आता या मोठ्या प्रमाणात काढल्या जाणाऱ्या रक्कमेमुळे याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होण्याची चिन्ह आहे. त्यामुळे अर्थतज्ज्ञ याविषयी चिंता व्यक्त करतायेत.
मोठी रक्कम काढली
परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात शेअर बाजारातून 41 हजार 123 कोटी रुपये काढले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून विदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारामधून पैसे काढत आहेत. ऑक्टोबर 2021 ते मार्च 2022 या कालावधीत त्यांनी भारतीय शेअर बाजारातून निव्वळ 1.48 लाख कोटी रुपये काढले असल्याची माहिती आहे.
यामुळे याचा बाजाराला मोठा फटका बसल्याचं बोललं जातंय. परदेशी गुंतवणूकदारांमुळे इतका मोठा फटका बसत असल्याने अर्थतज्ज्ञ देखील चिंता व्यक्त करतायेत.
अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार?
डिपॉझिटरी डेटानुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी (FPI) गेल्या महिन्यात शेअर बाजारातून 41 हजार 123 कोटी रुपये काढले आहेत. यापूर्वी त्यांनी फेब्रुवारीमध्ये शेअर बाजारातून 35 हजार 592 कोटी रुपये आणि जानेवारीत 33 हजार 303 कोटी रुपये काढले होते.
आता या मोठ्या प्रमाणात काढल्या जाणाऱ्या रक्कमेमुळे याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे अर्थज्ज्ञ याविषयी चिंता व्यक्त करतायेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
तज्ज्ञांचे काय मत?
परदेशी गुंतवणूकदारांनी काढलेल्या रक्कमेवर बोलताना UpsideAI चे सह-संस्थापक अतनू अग्रवाल म्हणाले की, ‘FPI काढण्याचे मुख्य कारण म्हणजे व्याजदरातील बदल आणि फेडरल रिझर्व्ह बँकेने प्रोत्साहन संपवण्याचे संकेत दिले, हे आहेत. इतरही अनेक कारणे आहेत. ज्यामुळे FPIs भारतीय बाजारातून माघार घेत आहेत.
यामध्ये भारतीय बाजार महाग होणे, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, रुपयाची कमजोरी आणि रशिया-युक्रेन संघर्ष या कारणांचा समावेश आहे. त्यामुळेच परदेशी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूकदार पर्यायांकडे वळत आहेत. फेडरल रिझव्र्हकडून व्याजदर वाढ पुढे ढकलण्याचे संकेत मिळाले असते, तर कदाचित हा प्रकार झाला नसता.’