Uncategorized

नाशिक : दुचाकीस्वार कंटरेनरच्या मागील चाकात अडकला…

नाशिक : दुचाकीस्वार कंटरेनरच्या मागील चाकात अडकला...

नाशिक : महाराष्ट्रात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.रस्ते अपघातात आज पुन्हा नाशिक जिल्ह्यात एकाने आपला जीव गमवला आहे. मुंबई – नाशिक (Mumbai-Nashik) महामार्गावर (Highway) एका भीषण अपघातात (Accident) मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झालाय. हा मोटारसायकलस्वार नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात होता. त्याने जुना कसारा घाट चढला. त्यानंतर अपघात झाला.

मृताचे शव रुग्णवाहिकेद्वारे इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. मात्र, अपघात इतका भीषण होता की, पोलिसांनाही ते दृष्य पाहून अक्षरशः धडकी भरली. त्यामुळे कुठेही जायची घाई करू नका. वाहने सावकाश चालवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पोलिसांकडून तसेच नेहमी सुरक्षीत वाहन चालवण्या बाबात सल्ला दिला जातो , तसेच वाहने सावकाश चालवा. घरी आपली कोणीतरी वाट पहात आहे…असे रस्त्यावर लागलेले फलक आपण पाहतो. मात्र, त्यातून कोणीच बोध घेत नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण काही केल्या थांबायला तयार नाही. अशी खंत समोर येत आहे.

नेमका अपघात कसा झाला ?

हा अपघात नाशिक – मुंबई महामार्गावरील कसारा घाट चढल्यानंतर घडल्याची माहिती समोर आली आहे. दुचाकीस्वार नाशिकहून मुंबईकडे चालला होतात. त्याने मुंबई – नाशिक महामार्गावरचा जुना कसारा घाट चढला. मात्र, तेथील वळणारवर दुचाकीस्वाराचा ताबा सुटला. त्यामुळे मोटारसायकल (MH04,KM4864) स्पील झाली. ती समोरच्या कंटेनरला (MH46,AF2269 मागून जाऊन धडकली.

या धडकेत दुचाकीस्वार कंटरेनरच्या मागील चाकात अडकला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी समजताच महामार्ग पोलिस व रूट पेट्रोलिंग टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृत व्यक्तीचे शव रुग्णवाहिकेद्वारे इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.

महिन्यात 9 जणांनी गमवला आपला जीव…

नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट ( helmet ), नो पट्रोल मोहीम सुरू केली. त्यानंतर त्यांचे समुपदेशन केले. परीक्षा घेतली. कार्यालयात हेल्मेटसक्ती करायचे आदेश दिले. हेल्मेटसक्ती न करणाऱ्या कार्यालयाच्या प्रमुखांना दंड ठोठावले. मात्र, अजूनही नाशिकमध्ये हेल्मेटसक्ती यशस्वी झाली नाही. पोलीस आयुक्ताच्या कार्यालयाबाहेर मात्र, हेल्मेट नसेल, तर प्रवेश नाही, हा फलक पाहायला मिळतो.मात्र नाशिकमध्ये ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button