Uncategorized

तुमचं ”आधार कार्ड” भंगारवाला विकतोय वीस रुपयात… भंगार वाल्याकडे सापडले शंभर आधार कार्ड, नेमकं काय आहे प्रकार…

तुमचं ''आधार कार्ड'' भंगारवाला विकतोय वीस रुपयात... भंगार वाल्याकडे सापडले शंभर आधार कार्ड, नेमकं काय आहे प्रकार...

नागपूर : नागपुरातील मेकोसाबाग (Mekosabag) परिसरातील भंगारवाल्याकडे एक नव्हे तर 100 आधारकार्ड (Aadhaar Card आढळून आल्याने खळबळ उडाली. एवढ्या मोठ्या संख्येनं आधारकार्ड एका भंगारवाल्याकडे (Bhangarwala) आले कसे? हे आधारकार्ड नेमके कुणाचे आहेत? या आधारकार्डचा काही गैरवापर झाला का? याचा तपास करण्याची गरज आहे. कारण आधारकार्डचा गैरवापर झाल्यास त्याचा मोठा फटका संबंधीत कार्डधारकाला होऊ शकतो.आधार कार्ड.. देशभरात तुमची आमची ओळख सिद्ध करण्याचा सर्वात मोठा पुरावा आहे हा पुरावा जर रस्त्यावर आढळू लागलाने मोठा चिंतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कोणी आणला उघडकीस प्रकार
भंगारवाला हा साधाभोळा व्यक्ती दिसतो. फक्त वीस रुपयांत तो आधारकार्ड परत करत आहे. याचा अर्थ बल्कमधीलच आधारकार्ड गहाळ होण्याची शक्यता आहे. पोलीस याचा शोध लावत आहेत. नेमकं काय घडलं हे त्यांच्या तपासानंतर उघड होईल. पण, तरीही नागपुरात हा चर्चेचा विषय झाला आहे.
कचऱ्यातून आधारकार्ड मिळाल्याचं सांगत, हा भंगारवाला वीस रुपयांत आधारकार्डची विक्री करत होता. जरीपटका पोलिसांनी याची चौकशी सुरु केलीय. आम आदमी पार्टीने स्टींग ॲापरेशन करत, हा प्रकार उघडकीस आणला, अशी माहिती संघटनमंत्री प्रभात अग्रवाल यांनी दिली.

तुमचा पुरावा भंगारात कसा?
छोट्या गोष्टी पासूनतर मोठ्या गोष्टीपर्यंत आधार कार्डची गरज भासत असते त्यातच आता तुमचा पुरावा रसत्यावर मिळला लागला तर मोठा चिंतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. आधार कार्ड हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा. पण, एवढे सारे आधारकार्ड भंगालवाल्याकडं आलेच, कसे असा प्रश्न निर्माण होतो.

भंगारात येवढे कार्ड सापडले. याचा अर्थ ते कुणीतही फेकून दिले असावेत. ही किमया एखाद्या पोस्ट मॅननं तर केली नाही ना अशी शंका येते. यापूर्वी पत्र न पोहचविता रद्दीत सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. असा हा प्रकार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरीही या प्रकरणाचा योग्य तपास केल्यास नेमकं काय घडलं ते समोर येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button