Maharashtra

पुढील ४८ तासात मुसळधार पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, तुमच्या जिल्ह्यात कशी असेल स्थिती ?

पुढील ४८ तासात मुसळधार पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, तुमच्या जिल्ह्यात कशी असेल स्थिती ?

Monsoon alert maharashtra : महाराष्ट्राचा हवामान अंदाज 2023 मान्सूनने वेळेआधीच संपूर्ण देश व्यापला असताना गेले चार-पाच दिवस विश्रांती घेतली होती. मात्र, मंगळवारपासून पुन्हा एकदा तो सक्रीय झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ४८ तासात वादळी वा-यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबई, महाराष्ट्रासह सध्या देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. राज्यातील विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस चांगलाच बरसला. दरम्यान गेली चार-पाच दिवस पावसाने विश्रांती घेतली. काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला तरीही हलक्या सरींनी शहराला ओलंचिंब केले. भारतीय हवामान खात्याने येणारे दोनही दिवस पावसाचेच असल्याचे सांगितले आहे.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

पाच आणि सहा जुलै दरम्यान राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सहा जुलैपर्यंत मान्सूनची तीव्रता वाढणार असून हा तीव्र कमी दाबाचा पट्टा कोकणाच्या उत्तर दिशेने सरकणार आहे. तर, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पर्जन्यमानाचा अंदाज आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईत बुधवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

याशिवाय, गुरुवारी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार आणि शुक्रवारीही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबईसाठी बुधवार ते शुक्रवार म्हणजेच 5 ते 7 जुलै दरम्यान ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तर आज पुण्यामध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे

पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांनाही आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई आणि ठाण्यात पावसाचा यलो अलर्ट आहे.

गुरुवारीही पुणे आणि साताऱ्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button