Uncategorized

शेतकऱ्यासाठी कामाची बातमी : या वर्षी पाऊस पडणार का ! यंदा हवामानाचा अंदाज कसा असेल, मागील वर्ष गेलं खरं…!

शेतकऱ्यासाठी कामाची बातमी : या वर्षी पाऊस पडणार का ? यंदा हवामानाचा अंदाज कसा असेल, मागील वर्ष गेलं खरं...!

मुंबई : मागील म्हणजे गेल्या वर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला मात्र अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलं.एकवेळेस ओला दुष्काळ बरा असतो पण कोरडा दुष्काळ ठिक नाही असे शेतक-याकडून बोललं जाते.यंदाचा पाऊसळा कसा असेल ? यांचा प्रश्न अनेक शेतक-यांना पडला असेल…पण यंदा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि पावसाबाबत महत्त्वाची बातमी आहे. ( this year skymet weather india )

हवामान खाते व स्कायमेटनं नेहमी शेतक-यांना हवामानाचे अंदाजपुरवण्याचे काम करते.यंदा पाऊस कसा राहील, याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. स्कायमेटनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 2022 मध्ये भारतात मान्सून सामान्य राहणार आहे.

यंदा सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस राहणार असल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे.

गेल्या दोन वर्षांतल्या पावसावर अल निनो या वादळाचा परिणाम होता. पण यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा तेवढा परिणाम राहणार नाही. तसंच प्रशांत महासागरातही मान्सूनला अडथळा ठरणारं वातावरण तयार झालं होतं,

त्याची तीव्रताही हळूहळू निवळते आहे त्यामुळे यंदा पाऊस सामान्य असणार आहे. एप्रिल महिन्यात मान्सून संदर्भात अधिक सविस्तर रिपोर्ट देण्यात येईल असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

मान्सूनमध्ये अजूनतरी कोणतेही अडथळे दिसत नाही असं म्हटलं आहे. मान्सूनचा प्रवास कसा असेल आणि कधी सुरू होणार याबाबत सविस्तर माहिती लवकरच येईल असंही त्यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button