जिओचा 75 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लान, तुम्हाला अमर्यादित कॉलिंगसह मिळणार मोफत एसएमएस सेवा
जिओचा 75 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लान, तुम्हाला अमर्यादित कॉलिंगसह मिळणार मोफत एसएमएस सेवा

Reliance Jio Cheapest Rupees 75 Recharge Plans : देशात असे अनेक ग्राहक आहेत ज्यांना इंटरनेटची जास्त गरज नाही. त्यांच्यासाठी मोबाईलचे बहुतेक काम फोन कॉल्स ऐकणे आणि करणे हे असते. अशा ग्राहकांची गरज ओळखून जिओने jio best offer आपला खास प्लान आणला आहे. त्या ग्राहकांसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.
ज्यांना कमी किमतीत कॉलचा लाभ घ्यायचा आहे. तुम्हीही कमी बजेटच्या स्वस्त योजनांच्या शोधात असाल तर ही योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. येथे तुम्हाला Jio च्या स्वस्त प्लॅन्सबद्दल सांगत आहोत, परंतु सर्व ग्राहक या प्लान्सचा लाभ घेऊ शकत नाहीत. मात्र, जिओच्या या प्लॅनमध्येही ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग, मोफत एसएमएस आणि इंटरनेटचा लाभ मिळतो.
रिलायन्स जिओचा ७५ रुपयांचा प्लॅन (Reliance Jio Cheapest Rupees 75 Recharge Plans)
रिलायन्स जिओचा 75 रुपयांचा प्लॅन फक्त जिओफोन ग्राहकांसाठी आहे. ही योजना इतर ग्राहकांसाठी लागू नाही. 75 रुपयांच्या या प्लॅनमध्ये JioPhone ग्राहकांना 23 दिवसांची वैधता मिळते. ग्राहकांना दररोज 0.1MB डेटा मिळतो.
याशिवाय 200MB अतिरिक्त डेटा देखील उपलब्ध आहे. तसेच, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि ५० एसएमएस मोफत उपलब्ध आहेत. यामध्ये जास्त डेटाचा फायदा ग्राहकांना मिळत नाही.
Reliance Jio चा सर्वात स्वस्त 91 रुपयांचा प्लॅन (Reliance Jio Rupees 91 Recharge Plan)
कोणताही ग्राहक Jio चा 91 रुपयांचा प्लॅन घेऊ शकतो. जर तुमच्याकडे Jio फोन नसेल तर हा सर्वात स्वस्त प्लॅन तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. 91 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांची वैधता मिळते.
तसेच, दररोज 0.1MB डेटा उपलब्ध आहे. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल्स आणि ५० एसएमएस मोफत मिळतील. जिओचा हा सर्वात स्वस्त प्लान आहे.