‘टेक्टॉन’नंतर निसान आणखी एका मोठ्या लाँचच्या तयारीत; आता पुन्हा 7-सीटर एसयूव्ही काढणार, जाणून घ्या फिचर्स
Nissan भारतात नवीन 7-Seater SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. Tekton वर आधारित ही कार Nissan Patrol कडून प्रेरित डिझाइन, हायटेक फीचर्स आणि 5-star safety सह येईल.

वेगवान न्यूज / लेखक : ऋषिकेश गांगुर्डे
नवी दिल्ली : Nissan Indian Market मध्ये आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे. कंपनीने नुकतीच आपली नवी Tekton SUV लाँच केली असून, आता एका नवीन 7-Seater SUV ची तयारी सुरू केली आहे. रिपोर्टनुसार, हे नवीन मॉडेल Tekton चे 7-Seater व्हर्जन असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, Renault देखील आपल्या Duster कारचे 7-Seater व्हर्जन तयार करत असल्याने या दोन्ही गाड्या एकाच प्लॅटफॉर्मवर आधारित असतील. चला तर मग जाणून घेऊया Nissan च्या या अपकमिंग 7-Seater SUV बद्दलच्या ५ महत्त्वाच्या गोष्टी.
Patrol कडून प्रेरित असेल डिझाइन Nissan ने अद्याप या नवीन SUV च्या डिझाइनबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, याचा लुक कंपनीच्या फ्लॅगशिप Nissan Patrol कडून प्रेरित असेल अशी जोरदार चर्चा आहे. Tekton ला आधीच ‘Baby Patrol’ म्हणून सादर करण्यात आले असून, तीच डिझाइन फिलॉसॉफी या 7-Seater मॉडेलमध्येही पाहायला मिळू शकते. या SUV मध्ये दणकट front grille, मस्क्युलर बॉडी आणि दमदार road presence मिळण्याची शक्यता आहे.
मोठा आकार आणि जास्त केबिन स्पेस नवीन 7-Seater SUV चा आकार Tekton पेक्षा मोठा असेल, जेणेकरून तिसऱ्या रो (Third Row) मधील प्रवाशांसाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल. रिपोर्टनुसार, हिची लांबी साधारण 4.5 ते 4.6 meters च्या दरम्यान असू शकते. यामुळे ही कार मोठ्या कुटुंबांसाठी एक अत्यंत प्रॅक्टिकल पर्याय ठरेल.
फीचर्समध्ये असणार नाही कोणतीही कमतरता फीचर्सच्या बाबतीत ही SUV अत्यंत प्रीमियम असणार आहे. यामध्ये Tekton मध्ये मिळणारी 10.1-inch touchscreen infotainment system, 10.25-inch digital instrument cluster, panoramic sunroof, wireless phone charger, आणि powered व ventilated front seats मिळण्याची पूर्ण अपेक्षा आहे. याशिवाय थर्ड रोच्या प्रवाशांसाठी स्वतंत्र AC vents, Type-C charging ports आणि अतिरिक्त storage space देखील दिला जाऊ शकतो.
सेफ्टीवर असेल विशेष भर Tekton ने BNCAP crash test मध्ये 5-Star safety rating मिळवली आहे. त्यामुळे याच्या 7-Seater व्हर्जनमध्येही हीच उच्च दर्जाची सुरक्षितता मिळण्याची शक्यता आहे. यात standard 6 airbags, 360-degree camera, Level-2 ADAS, electronic parking brake, तसेच front आणि rear parking sensors यांसारखे आधुनिक सेफ्टी फीचर्स दिले जाऊ शकतात.
इंजिन आणि लाँचिंग टाइमलाईन नवीन SUV मध्ये Tekton प्रमाणेच 1.0-litre turbo petrol (100 bhp, 166 Nm) आणि 1.3-litre turbo petrol (163 bhp, 280 Nm) इंजिनचे पर्याय मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, कारचा मोठा आकार पाहता 1.0-litre इंजिन थोडे अंडर-पावर्ड वाटू शकते. म्हणूनच कंपनी यामध्ये 1.8-litre naturally aspirated petrol-hybrid engine (160 bhp, 172 Nm) चा पर्याय देऊ शकते, जो Duster मध्येही पाहायला मिळू शकतो. मुंबईत या कारची संभाव्य on-road किंमत सुमारे ₹17 लाख ते ₹28 लाख दरम्यान असण्याचा अंदाज आहे.





