नाशिक – येवल्यात लाकडी दांडक्याने तुफान राहडा… अंगावर काटा आणणारी घटना… व्हिडीओ सारे काही सांगेल !
नाशिक - येवल्यात लाकडी दांडक्याने तुफान राहडा... अंगावर काटा आणणारी घटना... व्हिडीओ सारे काही सांगेल !

येवला : ते म्हणतात ना… कुणाची म्हैस आणि कुणाला उठ-बस असाच एक धक्कादायक आणि अंगावर क्षार येणारा प्रकार नाशिक जिल्ह्यातील येवल्यात घडलाय.
जिल्ह्यातील येवला तालुक्यात गुरासारखे मारहाण करणा-या गटाचा व्हिडिओ हाती लागला आहे.या व्हिडीओमद्ये चक्क लाकडी दांडके घेत एकमेकांना बदडणे सुरू होते. हा भयंकर प्रकार पाहून काही जणांना सहानुभूती वाटली. त्यांनी हे भांडण सोडवण्यासाठी धाव घेतली. मात्र, कसले काय. ते म्हणतात ना… कोणाच्या भांडणात न पडलेलं बर…पुढे या बिचाऱ्यांनाही भांडण करणाऱ्यांनी प्रसाद दिला.
मारहाणीत अनेकजणांना मुका मारला लागला आहे. तर काही जण जखमी झालेत. पोलिसांनी या प्रकरणी येवला शहर पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करून धरपकड सुरू केलीय. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. हे पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
यांनी तर महिलांनाही सोडले नाही ?
भांडण करणारे दोन गट इतके बेभान झाले होती की, त्यांनी महिलांनाही गुरासारखी मारहाण केली. त्यामुळे रस्त्यावर फक्त आरडाओरडा आणि किंकाळ्या होत्या. हे पाहून अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, त्यांनाही लाकडी दांडक्याचा प्रसाद मिळाला. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. इतरांचा शोध घेणे सुरू केले आहे.
नाशिक – येवल्यात लाकडी दांडक्याने तुफान राहडा… अंगावर काटा आणणारी घटना… व्हिडीओ सारे काही सांगेल ! pic.twitter.com/uNDw8EGOJJ
— Wegwannews (@wegwannews) February 21, 2022
आठ जणांना बेड्या
येवला तालुक्यातील कोटमगाव बुद्रुक येथील ही घटना आहे. गावातल्या दोन गटामध्ये किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी झाली. या घटनेतील बहुतांश सहभागी हे तिशीच्या आतील तरुण आहेत. त्यांनी रस्त्यावर राडा सुरू केला. घरात सरपणासाठी ठेवलेली मोठ-मोठी लाकडे उचलून आणत एकमेकांच्या डोक्यात घातली. हा प्रकार इतका भंयकर होता की, पाहणाऱ्या कोणत्याही सामान्याच्या काळजाचा ठोका चुकेल.