Uncategorized

Nashik – बिबट्याने महिलेवर घातली झडप… शेवटी आजीने बिबट्याशी केले दोन हात…पुढं काय घडलं

Nashik - बिबट्याने महिलेवर घातली झडप... शेवटी आजीने बिबट्याशी केले दोन हात...पुढं काय घडलं

नाशिक : जेव्हा एक बिबट्या अंगावर झडप घालतो तेव्हा अनेकांची पाया खालली माते सरकते,अनेक जन आपला जीव वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो.मात्र अन् चित्रपटालाही लाजवेल अशा पराक्रम गाजवत एका महिलेला काळ्याच्या तोंडातून सुखरूप बाहेर काढणा-या आजी पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे. त्यांच्या तोंडून हा प्रसंग ऐकण्यासाठी गावकरी अक्षरशः गर्दी करत आहेत.

असं काय घडलं ?

नाशिक-मुंबई आग्रा महामार्गावरील गोंदे फाट्याजवळ एका कामगार महिलेवर (woman) बिबट्याने (leopard) झडप घालून हल्ला चढविला. तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या आजीबाईंनी जोरदार आरओरड केली. बिबट्याच्या डोळ्यांत माती टाकली. अन् सुखरूप सोडविले.ते म्हणतात ना…काळजात मुठभर हिंमत असली की, त्या बळावर अशक्य ती गोष्ट शक्य करता येते. हेच एका आजीबाईंनी (grandmother) दाखवून दिले.

नेमके झाले काय?

नाशिक-मुंबई आग्रा महामार्गावरील गोंदे येथील सुरेखा विभुते व शांताबाई शिवाजी रेपूकर. या दोघीही भंगार वेचण्याचे काम करतात. नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्या भंगार वेचण्यासाठी निघाल्या. दोघीही गोंदे फाट्यावरील महामार्गावरुन गोदामाकडे जात होत्या. तेव्हा दबा धरुन बसलेल्या बिबट्याने सुरेखा विभुते यांच्यावर झडप घातली.

पुढे कायं घडलं

त्यांनी प्रतिकार केला. मात्र, त्याचवेळी प्रसंगावधान दाखवत विभुते यांच्यासोबत असलेल्या वयोवृद्ध शांताबाई यांनी बिबट्याला हुसकावण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.शांताबाईंनी अगोदर आरडाओरड केली. मात्र, बिबट्या काही केल्या मागे घटत नव्हता. त्यांनी सुरेखा यांना जबड्यात धरलेले. शेवटी शांताबाई धाडसाने पुढे झाल्या. त्यांनी खालची माती हातात घेऊन बिबट्याच्या डोळ्यात टाकली. त्यामुळे तो नमला आणि घाबरून शेपटी घालून त्याने तेथून धूम ठोकली. आजीबाईंचे हे प्रंसगावधान आणि धाडसामुळे सुरेखा विभुते यांचे प्राण वाचले. त्याबद्दल पंचक्रोशीत आजीबाईंचे कौतुक होत आहे.

फोटो सर्व काही सांगेल…

घटनेनंतर वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावला आहे. एकूणच या घटनेत आजीबाईंनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता बरोबर असलेल्या महिलेचे प्राण वाचवल्याने शांताबाईंचे सर्वत्र कौतुक होत आहे.बिबट्याच्या हल्ल्यात सुरेखा विभुते यांच्या पायाला, गुडघ्याला, तोंडावर जखम झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, वन विभागाला या घटनेची माहिती कळताच त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत विभुते यांची चौकशी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button