Maruti Suzuki Victoris ची वाढणार धडधड! Hyundai, Honda आणि Renault आणताहेत दमदार नवीन SUVs
Maruti Suzuki Victoris ची वाढणार धडधड! Hyundai, Honda आणि Renault आणताहेत दमदार नवीन SUVs

वेगवान न्यूज / लेखक : ऋषिकेश गांगुर्डे
नवी दिल्ली : मारुती सुझुकी व्हिक्टोरिस (Maruti Suzuki Victoris) मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. लाँच झाल्यापासून अवघ्या आठ महिन्यांच्या आत या कारने १ लाख युनिट्सच्या विक्रीचा टप्पा पार केला आहे. व्हिक्टोरिस दरमहा १०,००० पेक्षा जास्त युनिट्सची विक्री नोंदवत असून ती कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्यांपैकी एक बनली आहे.
व्हिक्टोरिसच्या या मोठ्या यशाने इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांची झोप उडवली असून, आता बाजारात हिला जोरदार टक्कर देण्यासाठी काही नवीन SUVs एन्ट्री घेणार आहेत. या अपकमिंग गाड्यांमध्ये हुंडईची नवीन बेयॉन आधारित SUV, होंडा एलिव्हेट फेसलिफ्ट आणि रेनो डस्टर हाइब्रिड यांचा समावेश आहे.
Hyundai Bayon-Based SUV Hyundai यावर्षी सणासुदीच्या काळात (दिवाळीच्या आसपास) एक नवीन मिड-साइज SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही कार कंपनीच्या ग्लोबल ‘Bayon’ कॉम्पॅक्ट क्रॉसओवरवरून प्रेरित असल्याचे मानले जात आहे. पोर्टफोलिओमध्ये हिला Creta च्या सोबत स्थान दिले जाईल. रिपोर्ट्सनुसार, याचे कोडनेम BC4i असे आहे. या गाडीची लांबी सुमारे 4.18 मीटर असू शकते. नवीन Hyundai SUV मध्ये पेट्रोल आणि CNG असे दोन्ही पॉवरट्रेन पर्याय मिळण्याची अपेक्षा आहे. पेट्रोल मॉडेलमध्ये 1.5-litre naturally aspirated petrol engine दिले जाऊ शकते, जे manual आणि automatic गिअरबॉक्ससोबत जोडलेले असेल. याच इंजिनची फॅक्टरी-फिटेड CNG आवृत्ती देखील लाईनअपचा भाग असू शकते.
Honda Elevate Facelift Honda देखील आपली लोकप्रिय Elevate SUV अपडेट करण्याच्या तयारीत आहे. 2026 Honda Elevate Facelift मध्ये मोठ्या मेकॅनिकल बदलांची अपेक्षा नाही. कंपनी सध्याचे 1.5-litre naturally aspirated petrol engine देणे कायम ठेवू शकते, जे सुमारे 121 bhp ची पॉवर जनरेट करते. फेसलिफ्ट मॉडेलच्या एक्सटीरिअरमध्ये सौम्य बदल पाहायला मिळतील. यामध्ये नवीन लाईटिंग सिग्नेचर असलेले अपडेटेड LED headlamps आणि री-डिझाइन केलेला front bumper समाविष्ट असू शकतो. केबिनमध्ये नवीन अपहोल्स्ट्री, अपडेटेड इंटीरियर ट्रिम आणि नवीन touchscreen infotainment system मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत, Elevate ला नवीन फीचर्स देऊन अधिक मॉडर्न बनवण्यावर होंडाचा भर असेल.
Renault Duster Hybrid Renault Duster Hybrid ही कार देखील Victoris ची डोकेदुखी वाढवू शकते. या SUV मध्ये 1.8-litre 4-cylinder naturally aspirated petrol engine सोबत दोन electric motors आणि 1.4 kWh lithium-ion battery pack दिला जाईल. याचे एकत्रित पॉवर आऊटपुट 160 bhp असल्याचे सांगितले जात आहे. शहरात ड्रायव्हिंग करताना Duster Hybrid तब्बल 80 टक्क्यांपर्यंत EV mode वर चालू शकते असा दावा रेनोने केला आहे. या पॉवरट्रेनसोबत 8-speed multi-mode DHT (Dedicated Hybrid Transmission) गिअरबॉक्स दिला जाईल. कंपनी हिला दिवाळीच्या सणासुदीच्या काळात भारतीय बाजारात उतरवू शकते.




