फक्त 4 लाख रुपयांना येणारी नवीन इलेक्ट्रिक कार, कॉमेट आणि टियागो ईव्हीला देणार टक्कर
फक्त 4 लाख रुपयांना येणारी नवीन इलेक्ट्रिक कार, कॉमेट आणि टियागो ईव्हीला देणार टक्कर

नवी दिल्ली : Blinq Mobility Car1 Price – भारतीय बाजारपेठेत सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ वाढत आहे, पण सामान्यांना अजूनही एका स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक कारची प्रतीक्षा आहे. सध्या MG Comet EV आणि Tata Tiago EV सारखे पर्याय उपलब्ध असले तरी, त्यांची किंमत अजूनही अनेकांच्या बजेटबाहेर आहे. हीच अडचण ओळखून गुरुग्राममधील Blinq Mobility ही स्टार्टअप कंपनी एक अत्यंत स्वस्त इलेक्ट्रिक कार घेऊन येत आहे.
किंमत असू शकते फक्त ४ लाख रुपये! मिळालेल्या माहितीनुसार, या कारला सध्या ‘Car1’ किंवा ‘Pod’ असे कोडनेम देण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कारची किंमत सुमारे ४ लाख रुपये असू शकते. जर ही कार या किमतीत लाँच झाली, तर ती सध्याच्या थ्री-व्हीलर रिक्षाच्या किमतीत उपलब्ध होईल आणि थेट MG Comet ला तगडी टक्कर देईल. २०२६ च्या पहिल्या सहामाहीत या कारवर कंपनी वेगाने काम करणार आहे.
डिझाइन आणि लूक (Design & Size) या कारचा लूक पहिल्या नजरेत ‘मॉडिफाईड टाटा नॅनो’ सारखा दिसतो. मात्र, कंपनीने ती पूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मवर (Skateboard Platform) तयार केली आहे.

-
आधुनिक फीचर्स: यात पुढच्या बाजूला LED हेडलाईट्स आणि एक चमकणारा ‘Blinq’ लोगो देण्यात आला आहे.
-
मजबूत बांधणी: कंपनीचा दावा आहे की, या कारच्या बॉडीसाठी हलक्या पण स्टीलपेक्षा मजबूत अशा ‘कंपोझिट’ मटेरियलचा वापर केला आहे.
-
सिटी फ्रेंडली: कारचा आकार लहान असल्याने शहराच्या ट्रॅफिकमध्ये आणि अरुंद गल्ल्यांमध्ये ही कार चालवणे खूप सोपे असेल.
बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉलॉजी (Battery Swapping) Blinq Mobility चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची बॅटरी स्वॅपिंग सुविधा.
-
मोबाईलप्रमाणे बॅटरी बदलता येणार: पेट्रोल पंपावर गेल्यावर जसं आपण २ मिनिटांत पेट्रोल भरतो, तसंच या कारची बॅटरी अवघ्या ५ मिनिटांत बदलता येईल.
-
यामुळे चार्जिंगसाठी तासनतास थांबण्याची गरज उरणार नाही. एकदा बॅटरी बदलली की ही कार सुमारे २५० किमीची रेंज देऊ शकते.
IIT दिल्लीच्या विद्यार्थ्याची भरारी या स्टार्टअपची सुरुवात IIT दिल्लीचे माजी विद्यार्थी निकेश बिष्ट यांनी केली आहे. त्यांच्या टीममध्ये अशा तज्ज्ञांचा समावेश आहे ज्यांनी यापूर्वी टेस्ला (Tesla) सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. नुकतेच कंपनीने ४.३ कोटी रुपयांचे फंडिंगही उभारले आहे.





