Mahindra Scorpio-N चे नवीन रूप कसे असेल? पुढील महिन्यात लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स
Mahindra Scorpio-N Facelift लवकरच होणार लाँच; Level-2 ADAS सह जाणून घ्या नवीन फीचर्स आणि किंमत

वेगवान न्यूज / लेखक : ऋषिकेश गांगुर्डे
नवी दिल्ली : Scorpio N Next Gen: नवीन गाडीमध्ये 2.0-litre mStallion turbo petrol आणि 2.2-litre mHawk diesel इंजिन मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही इंजिनांसोबत 6-speed manual आणि 6-speed automatic gearbox चे पर्याय दिले जाऊ शकतात.
भारतीय SUV बाजारात Mahindra Scorpio-N ही अत्यंत लोकप्रिय गाड्यांपैकी एक आहे. मस्क्युलर डिझाइन, मजबूत परफॉर्मन्स आणि शानदार road presence मुळे ही कार दीर्घकाळापासून ग्राहकांची पहिली पसंती बनली आहे. आता या SUV ला अधिक आकर्षक बनवण्यासाठी Mahindra लवकरच हिचे facelift model लाँच करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी पुढील महिन्यात या नवीन SUV वरून पडदा उचलू शकते.
नवीन Mahindra Scorpio-N Facelift च्या एक्सटीरिअरमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. रिपोर्टनुसार, यामध्ये नवीन front grille, पूर्वीपेक्षा जास्त आकर्षक LED headlights आणि DRLs, नव्या डिझाइनचे bumpers आणि alloy wheels दिले जाऊ शकतात. याशिवाय मागच्या बाजूला LED taillights आणि bumper मध्ये हलके बदल पाहायला मिळतील. कारचा दणकट आणि रग्ड लुक कायम ठेवत हिला अधिक प्रीमियम आणि मॉडर्न बनवणे हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे.
कारचे इंटीरियर आणि सेफ्टी इंटीरिअरबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन Scorpio-N Facelift पूर्वीपेक्षा अधिक हायटेक असणार आहे. यामध्ये मोठी touchscreen infotainment system, fully digital instrument cluster, wireless Android Auto आणि Apple CarPlay, 360-degree camera, panoramic sunroof, wireless mobile charging आणि premium sound system यांसारखे प्रीमियम फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच केबिनमध्ये उत्तम क्वालिटीचे मटेरिअल आणि नवीन dashboard design देखील पाहायला मिळू शकते, ज्यामुळे प्रवाशांना अधिक लक्झरी अनुभव मिळेल.
सुरक्षेच्या दृष्टीनेही Mahindra या SUV ला आधीपेक्षा अधिक मजबूत बनवत आहे. रिपोर्टनुसार, यामध्ये Level-2 ADAS टेक्नॉलॉजी जोडली जाऊ शकते, ज्यामध्ये adaptive cruise control, lane keep assist, automatic emergency braking आणि forward collision warning यांसारखे ॲडव्हान्स फीचर्स मिळतील. याव्यतिरिक्त 6 airbags, Electronic Stability Control (ESC), hill hold आणि hill descent control, Tire Pressure Monitoring System (TPMS) तसेच 360-degree camera यांसारखे सेफ्टी फीचर्स देखील दिले जाण्याची शक्यता आहे.
गाडीचा परफॉर्मन्स आणि किंमत इंजिन आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत फार मोठ्या बदलांची शक्यता नाही. नवीन Scorpio-N Facelift मध्ये सध्याचेच 2.0-litre mStallion turbo petrol आणि 2.2-litre mHawk diesel इंजिन दिले जाऊ शकते. दोन्ही इंजिनांसोबत 6-speed manual आणि 6-speed automatic gearbox चा पर्याय मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय काही विशिष्ट variants मध्ये 4X4 drive system देखील आधीप्रमाणेच उपलब्ध राहील.
किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, या facelift model ची सुरुवातीची ex-showroom किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा थोडी जास्त असू शकते. असा अंदाज आहे की याची सुरुवातीची किंमत सुमारे 13.8 लाख रुपयांपासून सुरू होऊन top variant साठी 25 लाख रुपयांच्या आसपास जाऊ शकते. मात्र, कंपनीने अद्याप लाँच डेट, किंमत आणि फीचर्सबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.





