Uncategorized

पुढील दोन दिवस महाराष्ट्राला मुसळधार पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा

पुढील दोन दिवस महाराष्ट्राला मुसळधार पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा

पुणे : ओडिशावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाने राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्लीयात आली आहे. तर 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

शनिवारी पुण्यासह राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असून, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवली आहे.

पुणे औरंगाबादमध्ये संततधार सुरूच

पुणे आणि औरंगाबादमध्ये शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याचे अनुभवायला मिळाली आहे. पुण्यातील पाषाण येथे 51 मिलीमीटर पावसाची नोंद झाली मात्र त्यानंतरही पावसाची रिपरिप सुरू होती. घाट क्षेत्रात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात दिसून आला. ‘आयएमडी’च्या लवासा येथील केंद्रावर 36 तासांमध्ये 325.5 मिमी पाऊस नोंदला गेला. महाबळेश्वरला शनिवारी दिवसभरात 100 मिमी पाऊस नोंदला गेला.

कमी दाबाचे क्षेत्र

बंगालच्या उपसागरात हंगामातील दुसरे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मोसमी वाऱ्यांचा जोर कायम आहे. दुसरीकडे पश्चिम किनारपट्टीवर दक्षिण गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य भारतावरून जाणारा पश्चिम- पूर्व कमी दाबाचा पट्टा (मान्सून ट्रफ) त्याच्या सर्वसाधारण स्थानापेक्षा दक्षिणेला आहे. या स्थितीच्या प्रभावामुळे राज्यात पुढील पाच दिवस सक्रिय मान्सूनची स्थिती राहील, असे ‘आयएमडी’ने हवामान अंदाजात म्हटले आहे.

घाट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक होता. लोणावळा येथे शुक्रवारी सकाळी साडेआठ ते शनिवारी रात्री साडेआठ या वेळेत १६३ मिमी पावसाची नोंद झाली. ‘आयएमडी’च्या लवासा येथील केंद्रावर ३६ तासांमध्ये ३२५.५मिमी पाऊस नोंदला गेला. महाबळेश्वरला शनिवारी दिवसभरात १०० मिमी पाऊस नोंदला गेला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याचे ‘आयएमडी’च्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. शनिवारी दिवसभरात राज्यातील विविध शहरांमध्ये नोंदला गेलेला पाऊस मिमीमध्ये : पुणे १३.३, नगर ४, कोल्हापूर २०, महाबळेश्वर १००, सातारा २१, सोलापूर २२, रत्नागिरी ३, परभणी ३, बुलढाणा १६, चंद्रपूर ४५, नागपूर १४, वर्धा १००.

दोन दिवस ‘रेड अलर्ट’

कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे येत्या १३ जुलैपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, दहा जुलैला रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा; तसेच ११ जुलैला या जिल्ह्यांसह पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता गृहीत धरून ‘आयएमडी’तर्फे या दोन विभागांना पुढील पाच दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मोठ्या पावसाचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि गोव्यातील घाट रस्त्यांवर दरडी कोसळू शकतात, असा इशारा ‘सेंटर फॉर सिटिझन सायन्स’च्या ‘सतर्क’ या उपक्रमांतर्गत देण्यात आला आहे.

तसेच राज्यात पेरणी झाल्यानंतर अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली होती. त्या ठिकाणी आता शेतकरी बांधव दुबार पेरणीसाठी पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.

एकंदरीत राज्यात सर्वत्र मोसमी पाऊस बघायला मिळत असून काही ठिकाणी मोसमी पाऊस शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी सिद्ध होत आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेले नाव अर्थातच पंजाबराव डख यांचा नवीन मान्सून अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) आता सार्वजनिक करण्यात आला आहे.

पंजाबराव डख साहेबांनी (Panjabrao Dakh) यावेळी केलेल्या नवीनतम मान्सून अंदाजानुसार, आज दहा जुलै रोजी राज्यातील अनेक ठिकाणी मोठा पाऊस बघायला मिळणार आहे. राज्यात विशेषतः पंढरपूर व आजूबाजूच्या परिसरात अति मुसळधार पावसाची हजेरी राहणार आहे. आज आषाढी एकादशी असल्याने पंढरपुरात वारकऱ्यांची अफाट गर्दी राहणार आहे.

अशा परिस्थितीत अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने डख साहेबांनी यावेळी वारकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा देखील दिला आहे. हवामानात अचानक बदल झाल्याने पंढरपूर मध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचे पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी स्पष्ट केले.

पंढरपूर व्यतिरिक्त राज्यातील लातूर, सोलापूर, बीड, अहमदनगर, सातारा, सांगली, पुणे, तसेच कोकण किनारपट्टी, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र सर्वत्र आज मोठा पाऊस होणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे.

पंजाब रावांनी नव्याने वर्तवलेल्या नवीनतम सुधारित अंदाजानुसार (Panjab Dakh Weather Report) उद्या अर्थात 11 जुलै रोजी पावसाची उघडीप बघायला मिळणार आहे. 11 व 12 जुलै पावसाची उघडीप राहणार असल्याने शेतकरी बांधवांनी या दरम्यान आपली शेतीची कामे करून घ्यावीत असा सल्ला देखील यावेळी पंजाबराव यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

मुंबईतदेखील येत्या २४ तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विशेषतः दक्षिण आणि पश्चिम भारतात मान्सूनचे ढग सतत बरसत आहेत. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात किमान १३० गावे बाधित झाली असून त्यापैकी 128 गावांचा संपर्क तुटला आहे. महाराष्ट्राशिवाय कर्नाटक आणि तेलंगणा या दक्षिणेकडील राज्यांमध्येही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने एका म्हटले आहे की, पुढील पाच दिवस मध्य भारत आणि पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय मान्सूनची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, शनिवारी तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेश, गुजरातमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश, ओडिशा, गोवा, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, केरळ आणि कर्नाटकमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी झाली.

हवामान खात्याने आज रविवारी पंजाब, हरियाणा आणि उत्तर उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मान्सून सुरू झाल्यापासून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. पूर्व महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे १२८ गावांचा संपर्क तुटला आहे. मराठवाड्यातील गडचिरोली, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

गेल्या २४ तासांत मुंबईचा जोर ओसरला असला तरीदेखील आपत्कालीन घटनांचे सत्र सुरूच आहे. ९ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले असून, ११ ठिकाणी झाडे कोसळली आहेत. एका ठिकाणी इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. यात जीवितहानी झाली नाही. तसेच दि. १० जुलै रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा येथे रेड अलर्ट त्याचप्रमाणे ११ जुलै पालघर, रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सातारा येथे ऑरेंज अलर्ट आणि १० ते १३ जुलै मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा यलो अलर्ट आहे.

गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. एक – दोन ठिकाणी अतिवृष्टी झाली. पुढील पाच दिवस हीच स्थिती कायम राहील. ओडिशा आणि आसपासच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. गुजरात तटपासून कर्नाटक तटपर्यंत द्रोणीय क्षेत्र आहे. याच्या प्रभावामुळे पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टीवर, मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button