Uncategorized

आता शेतक-यांना मिळणार मोफत कांदाचाळ, असा करा अर्ज

आता शेतक-यांना मिळणार मोफत कांदाचाळ, असा करा अर्ज

Kanda Chal Anudan Yojana Maharashtra 2022

भारत हा कृषी प्रधान देश आहे. तसेच केंद्र व राज्य सरकार शेतक-यांना चालना देण्यासाठी सक्षम आहे.  महाराष्ट्रात कांदा पिकाची लागवड मुख्यत्वे करुन नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, बुलढाणा, जळगाव व धुळे या जिल्ह्यात केली जाते. कांदा पिकाखालील क्षेत्र व उत्पादनात भारत जगात दुस-या क्रमांकावर असून देशांतर्गत गरजा भागवून भारतातून कांद्याची मोठा प्रमाणावर निर्यात करुन बहुमोल असे परकीय चलन देखील प्राप्त होते. कांदा दिर्घकाळ टिकविणे. शेतकऱ्यांना रास्त दर उपलब्ध करुन देण्यासाठी सदर योजना राबविली जाते.

कांदा लोकांच्या दररोजच्या आहारातील अविभाज्य भाग आहे. जून ते ऑक्टोंबर, प्रसंगी फेब्रुवारी पर्यंत रब्बी हंगामात तयार झालेला कांदा पुरवून वापरला जातो आणि म्हणूनच कांदा साठवणुकीची नितातं गरज भासते. कारण या कालावधीत नवीन कांदा कोठेही उत्पादीत होत नसतो. महाराष्ट्रात स्थानिक व निर्यात लक्षात घेता सन 2013 पर्यंत 8 लाख मे.टन राज्याची साठवणूक क्षमता होणे आवश्यक आहे.

खरीप हंगमामात कांदा काढला की, लगेच मागणी असल्यामुळे विकला जातो म्हणून किंवा रांगडा हंगामातील कांदा सुकवून साठविला जाऊ शकतो. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेची मागणी व निर्यातीची मागणी भागविणेसाठी कांदा साठवणूक क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहकांनामाफक दरात व सातत्याने कांदा उपलब्ध होऊ शकतो.

Kanda Chal Anudan Yojana Maharashtra 2022 Subsidy

शेतक-यांसाठी काय आहे योजना :-

पारंपारिक पध्दतीने कांदाचाळीची उभारणी करताना खर्चात जरी बचत होत असली तरी साठवणुकीतील होणारे नुकसान हे मोठा प्रमाणात असल्यामुळे एकंदरीत या चाळी आर्थिकदृष्टा सक्षम होत नाहीत. त्यामुळे कांद्याच्या शास्त्रोक्त चाळी उभारण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत राष्ट्र्ीय कृषि विकास योजने अंतर्गत राज्यात कांदाचाळ योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेनुसार कांदाचाळीचा बांधकाम खर्च 6000 प्रति मे.टन एवढा निर्धारीत असून बांधकाम खर्चाच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त रु.1500 प्रति मे.टन एवढे अनुदान देण्यात येते. त्यासाठी शेतकऱ्यांनी निर्धारीत आराखडाप्रमाणे बांधकाम करणे बंधनकारक आहे.
  • घेतल्याचा दाखला जोडावा.
  • अर्जदारासह कांदाचाळीचा फोटो जोडावा. Kanda Chal Anudan Yojana
  • सदर योजनेतुन पती किंवा पत्नी यापैकी एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येईल.
  • लाभ घेता येईल.

50 टन क्षमतेच्या कांदा चाळीचे अंदाजपत्रक

अ.क्र. तपशील परिमाण दर युनिट रक्कम
1. पाया खोदाईचे काम 10.2 ढोबळ मानाने ढोबळ मानाने 1700.00
2. पायामधील प्लेन सिमेंट कॉंक्रिट प्रमाण – 1 : 4 : 8 2.55 1377.50 घन मी. 3512.63
3. खांबासाठी पाया सळईसहचे सिमेंट कॉंक्रिट प्रमाण – 1 : 2: 4 6.21 2202.50 घन मी. 13666.51
4. सिमेंट कॉंक्रिट खांबासाठी लोखंडी बार / शिगा 289.41 39.40 कि.ग्रॅ. 11402.75
5. स्ट्रक्चरल स्टील (अँगल इ.) 3314.78 42.20 कि.ग्रॅ. 139883.72
6. खांबासाठी 2 इंच व्यासाचे लोखंडी पाईप 104.40 175.00 मीटर 18270.00
7. ॲजबस्टॉस सिमेंटचे पत्र्याचे छप्पर 160.00 231.25 चौ.फुट 37000.00
8. ॲजबेस्टॉस सिमेंटती पन्हाळी (रीज) 25.00 192.50 मीटर 4812.50
9. 2 इंच व्यासाचे अर्धगोल बांबु, 3 इंच अंतरावर (तळ व भिंती करीता) 2798.40 10.50 मीटर 29383.20
एकूण 259631.31
5 टक्के अकस्मित खर्च 12981.57
एकुण 272612.88
4 टक्के व्हॅट 10904.51
33 टक्के अंदाजित किंमतीवर 12.24 टक्के सर्व्हिस टॅक्स 11011.38
एकुण एकंदर 294528.77
(अक्षरी रुपये दोन लाख चौऱ्यानव हजार पाचशे एकोमतीस मात्र)

 

25 टन क्षमतेच्या कांदा चाळीचे अंदाजपत्रक

अ.क्र. तपशील परिमाण दर युनिट रक्कम
1. पाया खोदाईचे काम 3.89 ढोबळ मानाने ढोबळ मानाने 1200.00
2. पायामधील प्लेन सिमेंट कॉंक्रिट प्रमाण – 1 : 4 : 8 0.73 1377.50 घन मी. 1004.20
3. खांबासाठी पाया सळईसहचे सिमेंट कॉंक्रिट प्रमाण – 1 : 2: 4 2.34 2202.50 घन मी. 5151.65
4. सिमेंट कॉंक्रिट खांबासाठी लोखंडी बार / शिगा 137.38 39.40 कि.ग्रॅ. 5412.77
5. स्ट्रक्चरल स्टील (अँगल इ.) 1724.45 42.20 कि.ग्रॅ. 72771.79
6. खांबासाठी 2 इंच व्यासाचे लोखंडी पाईप 58.00 175.00 मीटर 10150.00
7. ॲजबस्टॉस सिमेंटचे पत्र्याचे छप्पर 83.20 231.25 चौ.फुट 19240.00
8. ॲजबेस्टॉस सिमेंटती पन्हाळी (रीज) 13.00 192.50 मीटर 2502.50
9. 2 इंच व्यासाचे अर्धगोल बांबु, 3 इंच अंतरावर (तळ व भिंती करीता) 1454.40 9.00 मीटर 13089.60
एकूण 130522.51
5 टक्के अकस्मित खर्च 6526.12
एकुण 137048.63
4 टक्के व्हॅट 5481.95
33 टक्के अंदाजित किंमतीवर 12.24 टक्के सर्व्हिस टॅक्स 5535.69
एकुण एकंदर 148066.27
(अक्षरी रुपये एक लाख अठ्ठेचाळीस हजार सहासष्ठ मात्र)

कांदाचाळ अनुदान योजना

(ब) सहकारी संस्थानी अनुदानासाठी प्रस्ताव दाखल करण्याची पद्धत:
सहकारी संस्था, कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी कांदाचाळीचे काम चालू करणेपुर्वी कांदाचाळीबाबतचा प्रस्ताव पणन मंडळाचे मुख्य कार्यालये, पुणे येथे खालील बाबीच्या माहितीसह प्रस्ताव तत्वत: मंजूरीसाठी सादर करावा.

  • कांदा साठवणूक प्रकल्पाची उभारणी सुरु करणेपूर्वी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडे तत्वत: मंजूरीसाठी सादर करावा.
  • संस्थे मार्फत किती मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी उभारणार याबाबत संस्थेच्या संचालक मंडळ सभेत पारीत करण्यात आलेल्या ठरावाची प्रत अर्जासोबत जोडावी.
  • संस्थेच्या नावे जागा असलेबाबत पुरावा (गाव नमुना क्र.7, 7-अ/12) अथवा करीता कमी 30 वर्षे लीजवर घेतलेली असल्यास त्याबाबतची कागदपत्रे.
  • प्रस्तावीत जागेचा स्थळदर्शक नकशा.
  • साठवणूक प्रकल्प उभारणीसाठी निधीचे नियोजन संस्था कशा रितीने उभारणी करणार याबाबत अर्जात स्पष्ट उल्लेख असावा.

लाभाचे स्वरूप:-

वैयक्तिक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 100 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळीसाठी 1 लाख 50 हजार अनुदान दिले जाते. तर इतर सहकारी संस्था/कृषि उत्पन्न बाजार समित्या / कांदा उत्पादक सहकारी संस्था यांना जास्तीत जास्त 500 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळींसाठी 7 लाख 50 हजार एवढे अनुदान दिले जाते.

या ठिकाणी संपर्क साधावा :-

पणन मंडळाचे मुख्यालय/विभागिय कार्यालय /जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था किंवा कृषि उत्पन्न बाजार समित्या.

अनुदानासाठी अर्ज
कांदाचाळीचे बांधकाम करण्यापुर्वी संबंधीतांनी विहीत नमुन्यातील कांदाचाळीचा आराखडा व अर्ज संबंधीत कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून प्राप्त करुन घ्यावा. त्यानुसारच कांदाचाळीचे बांधकाम करणे बंधनकारक आहे. कांदाचाळीचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर विहीत नमुन्यातील कांदाचाळी अनुदानाचा यांच्या प्रस्ताव संबंधीत बाजार समिती यांच्या कार्यालयात खालील बाबीसह सादर करावा. अचूक व परिपूर्ण प्रस्ताव योग्य ती शहानिशा करुन स्विकृत करण्याची संपूर्ण जबाबदारी ही सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती यांची राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button