Uncategorized

सावधान – आता हा हॅकर्स तुमच्या फोनचा कॅमेरा, मायक्रोफोन,कॉल हिस्ट्रीसह अन्य डेटाची चोरी करणार …

सावधान - आता हा हॅकर्स तुमच्या फोनचा कॅमेरा, मायक्रोफोन,कॉल हिस्ट्रीसह अन्य डेटाची चोरी करणार ...

now these hackers will steal your phone’s camera, microphone, call history and other data

नवी दिल्ली : भारतीय सैन्याचे जवान आणि अधिकाऱ्यांना टार्गेट करणाऱ्या हॅकर्सच्या ग्रुपने CapraRAT नावाचा एक मॅलवेयर तयार केला आहे.

या मॅलवेयरचा हेतू भारतीय जवान आणि अधिकाऱ्यांना निशाणा बनविण्याचा आहे CapraRAT नावाचा हा नवीन हँकिंग सॉफ्टवेअरचा खुलासा धोकादायक मानला जात आहे. या मॅलवेयरच्या मदतीने अँड्राइड डिव्हाइसला हॅक करणे शक्य आहे. हा एक Remote Access Trojan (RAT) असून, जो यूजर्सचे लोकेशन, कॉन्टॅक्ट नंबर आणि कॉल हिस्ट्रीसह खासगी माहिती चोरी करू शकतो.

या हॅकिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने हॅकर्स यूजर्सच्या फोनचा कॅमेरा आणि मायक्रोफोनला देखील अ‍ॅक्सेस करू शकतात. याच्या मदतीने खासगी माहिती चोरी केली जाऊ शकते.यामुळे लोकांचे तसेच अधिकाऱ्याची खाजगी माहिती लीक होण्याची शक्यता आहे.

कोणी लावला याचा शोध…

नवीन हॅक टूलचा शोध सायबर सिक्योरिटी फर्म Trend Micro ने लावला आहे. त्यांनी जानेवारी २०२० ते सप्टेंबर २०२१ पर्यंतच्या डेटाच्या आधारावर ही माहिती दिली. फर्मने सांगितले की, APT36 हे CapraRAT ला वापरताना आढळले.

या ग्रुपला Earth Karkaddan, Operation C-Major, PROJECTM, Mythic Leopard आणि Transparent Tribe च्या नावाने देखील ओळखले जाते. रिपोर्टनुसार, CapraRAT जवळपास Crimson RAT सारखा आहे, ज्याचा वापर APT36 विंडोज डिव्हाइसला टार्गेट करण्यासाठी केला जातो.

दोन्ही मॅलवेयरच्या डिझाइनमध्ये खूप समानता आहे. Crimson RAT प्रमाणेच या मॅलवेयरला देखील टार्गेट यूजरच्या डिव्हाइसमध्ये शिरकाव करण्यासाठी फिशिंग लिंकची मदत घ्यावी लागते.

दोन्ही मॅलवेयरमध्ये फंक्शन नेम, कमांड्ससह अनेक गोष्टी समान आहेत. याच कारणामुळे फर्म याला Crimson RAT चे मॉडिफाइड व्हर्जन असल्याचे सांगत आहे. रिपोर्टनुसार, या मॅलवेयरला टार्गेट फोनपर्यंत पोहचण्यासाठी बनावट सरकारी कागदपत्रं, हनीट्रॅप अथवा करोनाशी संबंधित माहितीचे स्वरुप दिले जाऊ शकते. डाउनलोड झाल्यानंतर हे इतर अ‍ॅप्सप्रमाणे सिस्टम परमिशन मागते.

त्यानंतर हे सॉफ्टवेअर यूजर्सची खासगी माहिती चोरी करू शकते. या मॅलवेयरच्या मदतीने हॅकर्स यूजर्सच्या फोनचे लोकेशन, कॉल हिस्ट्री, मायक्रोफोनचा अ‍ॅक्सेस आणि ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करू शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button