तुम्हाला लोन रिकव्हरी एजंट्स दादागिरी, शिवीगाळ, फोन करून त्रास देत असतील तर, अशी करा तक्रार… आरबीआय कठोर पावले उचलण्याच्या तयारीत..
तुम्हाला लोन रिकव्हरी एजंट्स दादागिरी, शिवीगाळ, फोन करून त्रास देत असतील, अशी करा तक्रार... आरबीआय कठोर पावले उचलण्याच्या तयारीत..

मुंबई – कर्ज काढून लोक आपला नवीन व्यवसाय किंवा स्वप्न पूर्ण करत असतात त्यात देशातील असंख्य कर्जदार होम लोन किंवा व्यवसायिक कर्ज काढून EMI प्रमाणे हप्ता भरण्याचे काम करत असतात.मात्र कर्ज वसुली करण्यासाठी कर्जदारांवर दादागिरी, शिवीगाळ करणाऱ्यांना लवकरच चाप बसणार आहे.
लोन रिकव्हरी एजंट्सची ही वागणूक अस्वीकारार्ह आहे, असे स्प्षट मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे. रिझर्व्ह बँकेने हे गांभिर्याने घेतले असून, या प्रकरणात कठोर कारवाईची पावले आगामी काळात उचलली जाणार आहेत. साधारणपणे आपातकालीन स्थितीत, अचानक काही आवश्यक निकड असेल तेव्हाच सामान्य नागरिक कर्ज घेतात.
अनेकदा असेही होते की, कर्जदारांची कर्ज फेडण्याची इच्छा असते, सुरुवातीचे काही हप्ते ते भरतातही, मात्र त्यानंतर आर्थिक स्थितीमुळे, उत्पन्नात पडलेल्या खंडामुळे त्यांना पुढचे हप्ते भरणे शक्य होत नाही.
त्यामुळे असे कर्जदार डिफॉल्टरच्या यादीत जातात. त्यानंतर बँका लोन रिकव्हरी एजंट्सच्या माध्यमातून या कर्जदारांना त्रास देण्यास सुरुवात करतात. तसेच त्यांच्या आर्थिक समस्या चा फायदा घेऊन नेहमी कर्जदार तगादा लावण्याचे काम करत असतात.
लोन रिकव्हरी एजंटसकडून कर्जदारांचा होतो छळ
लोन रिक्वहरी एजंटसचे काम हे कर्ज वसूल करणे असते. त्यासाठी ते साम, दाम, दंड, भेद असा कोणत्याही प्रकाराचा उपयोग करतात. वेळी-अवेळी फोन करुन, ते कर्जदारांवर दादागिरी करतात तसेच शिवीगाळही करतात. या अशा धमक्या देणे, हे खरेतर बेकायदेशीर आहे, मात्र सध्याच्या दिवसात हे अगदी सहजपणे सुरु असलेले दिसते. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या लोन रिकव्हरी एजेंटसच्या या हरकतींची दखल घेतली असून, आता यावर कठोर उपाय करण्यात येणार आहेत.
लोन रिकव्हरी एजंट्सची वागणूक अस्वीकारार्ह
हे लोन रिकव्हरी एजंट्स चुकीचे वागत आहेत, त्यांची वागणूक स्वीकारण्यासारखई नाही, असे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे. लोन रिक्वहरी एजंट्स वेळी अवेळी कर्जदारांना करत असलेले फोन, तसेच त्यांच्यावर करत असलेली दादागिरी अयोग्य असल्याचे दास म्हणाले आहेत. याबाबत रिझर्व्ह बँक गंभीर असून, याबाबत कठोर पावले उचलण्यात कचराई करणार नाही, असेही दास यांनी स्पष्ट केले आहे.
ज्या अनियंत्रित फायनान्स कंपन्या आहेत, त्यांच्याकडून हे प्रकार सर्रास होतात, याबाबतच्या तक्रारीही मिळालेल्या आहेत. तर काही नियंत्रित फायनान्स कंपन्यांकडूनही असे प्रकार होत असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले. आता याबाबत तक्रारी आल्यानंतर कायदेशीर कारवाई करणाऱ्या यंत्रणांना याची माहिती देण्यात येणार असल्याचेही दास यांनी स्पष्ट केले आहे. सर्व बँकांनाही यबाबतच्या सूचना देण्यात आले असल्याचेही दास यांनी स्पष्ट केले आहे.
जर रिकव्हरी एजंट जास्तच त्रास देत असेल, चुकीची कृती केली केली असेल, चुकीचे पत्र पाठवले असेल तर त्याच्या आधारावर कोर्टात वकिलामार्फत जाता येणे शक्य असते.
जर रिकव्हरीने बेकायदेशीर कारवाी केली, मारहाण केली, घरातील एखादी वस्तू जप्त केली तर कर्जदार पोलिसांत तक्रार करु शकतो.
लोक अदालत किंवा ग्राहक कोर्टात जाण्याचा पर्याय या कर्जदारांसमोर असतो.