देश-विदेश

असं काय घडलं होतं त्या दिवशी अनिल आणि मुकेश अंबानी यांच्यात ऐवढा वाद पेटला ! कारण हादरवणारं

असं काय घडलं होतं त्या दिवशी अनिल आणि मुकेश अंबानी यांच्यात ऐवढा वाद पेटला ! कारण हादरवणारं

मुंबई : जसं जशी श्रीमंती वाढत जाते व कुटूंबात लोकांची संख्या वाढते तेव्हा प्रत्येक फाॅमेलीत मत भेद वाढतच चालतात.असे एक उदाहरण देशातील उद्योगपतीच्या बाततीत घडला आहे. 2005 ला देशातील या सर्वाधिक मोठ्या व्य़ावसायिक कुटुंबाचे वाटे झाल्यानंतर चित्र बरंच बदललं. जिथं मुकेश अंबानी यांच्या नेतृत्त्वात रिलायन्स उद्योग समुहानं अग्रस्थान पटकावलं तिथेच अनिल अंबानी मात्र दिवाळखोरीच्या वळणावर पोहोचले होते.
ज्यावेळी तो सर्वांसमक्ष येतो तेव्हा मात्र त्याची बरीच चर्चा होते. देशातील प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक असणाऱ्या अंबानी कुटुंबातही अशाच प्रकारची ठिणगी पडली आणि साऱ्या देशात याचीच चर्चा सुरु झाली. (Mukesh Ambani Anil Ambani)

असं काय झाले की यांचा वाद वाढतच आहे.
दोन्ही भावांमध्ये नेमका वाद का झाला आणि याचे परिणाम पुढे कसे समोर आले, हा प्रश्न कायमच उपस्थित केला गेला. चला जाणून घेऊया यामागचं उत्तर…

Whatsapp Group Join
Telegram channel Join

धीरुभाई अंबानी हयात असताना दोन्ही भावांमध्ये कोणताच वाद झाला नव्हता. पण, वडिलांच्या निधनानंतर मुकेश आणि अनिल यांच्यात खटके उडू लागले. 2002 मध्ये रिलायन्सचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचं निधन झालं. वयाच्या अवघ्या 69 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मतभेदांमुळे या दोघांनीही आपली पदं वेगळी करुन घेतली. मुकेश अंबानी हे संचालक तर, अनिल अंबानी उपसंचालक पदी सक्रिय झाले. पण, हे सामंजस्य फार काळ टीकलं नाही.

माध्यमांमध्ये झालेल्या चर्चेनुसार आपल्या परवानगीशिवाय दुसऱ्य़ा भावाने कोणातही निर्णय घेऊ नये, असंच या दोघांना वाटत होतं. या दोघांमध्येही संवाद कमी झाला होता. दरम्यानच अनिल अंबानी यांनी पॉवर जनरेशन प्रोजेक्टची घोषणा केली. हा निर्णय मुकेश अंबानी यांना न विचारता घेतला असल्यामुळं त्यांना हादरा बसला.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

भावाच्या या वागण्याला उत्तर देत मुकेश अंबानी यांनी रिलायन्स उद्योग समूहातील अनेक कंपन्यांना नव्यानं एकत्र आणण्याचा निर्णय घेतला. इथूनच वाद विकोपास गेला, जिथं मुकेश अंबानी आपल्याकडेच सर्व ताकद असल्याचं समजत होते, तिथे अनिल अंबानी स्वत:लाही त्याच ताकदीचे समजत होते.

2004 या वर्षी त्यांच्यात असणारी जरी सर्वांसमोर आली. धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर रिलायन्स बोर्डानं एक प्रस्ताव समोर आणला, ज्यामध्ये संचालकाकडे संपूर्ण जबाबजारी असल्याचं सांगण्यात आलं. अनिल अंबानींनी याकडे अपमानाच्या नजरेतून पाहिलं आणि त्यांनी काही आर्थिक कामांसाठीच्या कागदपत्रांर स्वाक्षरी करण्यासही नकार दिला.

भावाभावांमध्ये पेटलेला हा वाद आईपर्यंत पोहोचला आणि त्यांनी पुढे येत काही कौटुंबीक व्यक्तींच्या मदतीनं संपूर्ण रिलायन्स समुहाची दोन्ही भावांमध्ये वाटणी केली.

त्या वेळी दोन्ही भाऊ, व्यवसायात एकसारख्याच टप्प्यावर होते. पण, आता मात्र त्यांच्यात असणारी दरी वाढली आहे. मुकेश अंबानी आज उद्योगजगतात परमोच्च शिखरावर आहेत. तर, अनिल अंबानी मात्र काहीसे ढासळल्याचं दिसून येत आहे.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button