ही बाईक फक्त १८०० च्या EMI वर घरी आणा, फुल टॅंक मध्ये ७०० किमी धावणार, जाणून घ्या किंमत
ही बाईक फक्त १८०० च्या EMI वर घरी आणा, फुल टॅंक मध्ये ७०० किमी धावणार, जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली : हिरो एचएफ डिलक्समध्ये ९७.२ सीसीचं एअर-कूल्ड, ४-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर ओएचसी इंजिन दिलंय. सोबतच ४-स्पीड गिअरबॉक्स असल्यामुळे गाडी चालवायला एकदम लोण्यासारखी स्मूद वाटते. चला तर मग, बघूया सविस्तर माहिती.
जर तुम्ही रोजच्या येण्या-जाण्यासाठी एखादी स्वस्त आणि मस्त मायलेज देणारी गाडी शोधत असाल, तर हिरो एचएफ डिलक्स तुमच्यासाठी एकदम नादखुळा पर्याय आहे. ही गाडी हिरो स्प्लेंडर प्लस आणि होंडा शाईनसारख्या गाड्यांना जोरदार टक्कर देते. कमी देखभाल आणि हलक्या वजनामुळे ही गाडी लोकांच्या मनावर राज्य करत आहे.
हिरो एचएफ डिलक्सची एक्स-शोरूम किंमत ५९ हजार ८३९ रुपयांपासून सुरू होते, तर डिलक्स प्रो मॉडेलची किंमत ७० हजार १५० रुपये आहे. मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही गाडी खिशाला परवडणारी आहे. गाडीचा लूक एकदम मॉडर्न आणि देखणा आहे. याची स्टाईलिश बॉडी, आरामदायी सीट आणि हलकं वजन यामुळे ही गाडी चालवताना कसलाही त्रास होत नाही.

जर तुम्हाला हिरो एचएफ डिलक्स खरेदी करायची असेल, तर एका झटक्यात पूर्ण पैसे भरायची गरज नाही. तुम्ही या गाडीचं डिलक्स प्रो मॉडेल फक्त १० हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर घरी नेऊ शकता. ९.७ टक्के व्याजदराने जर तुम्ही ३ वर्षांसाठी लोन घेतलं, तर तुम्हाला दरमहा ३ हजार ३०७ रुपये हप्ता (EMI) भरावा लागेल. इतकंच नाही, तर ४ वर्षांसाठी लोन घेतलं तर दरमहा फक्त १ हजार ८११ रुपये हप्ता येईल.
कसे आहेत हिरो एचएफ डिलक्सचे फीचर्स?
फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर यात जबरदस्त ब्रेकिंग सिस्टीम, चांगलं सस्पेंशन, डिजिटल मीटर, इग्निशन सिस्टीम आणि ट्यूबलेस टायर दिले आहेत, ज्यामुळे तुमचा प्रवासाचा अनुभव अजूनच सुधारतो. इंजिनच्या बाबतीत बोलायचं तर यात ९७.२ सीसीचं कडक इंजिन आणि ४-स्पीड गिअरबॉक्स आहे, जो गिअर टाकताना एकदम स्मूद फील देतो.
हिरो एचएफ डिलक्सची पेट्रोल टाकी ९.६ लीटरची आहे आणि एकदा टाकी फुल्ल केली की ही गाडी तब्बल ७०० किलोमीटरपर्यंत धावू शकते. डिलक्स प्रो मॉडेलमध्ये ‘i3S’ तंत्रज्ञान सुद्धा दिलंय, ज्यामुळे पेट्रोलची मोठी बचत होते. मार्केटमध्ये ही गाडी होंडा शाईन आणि हिरो स्प्लेंडर प्लसला घाम फोडत आहे.





