देश-विदेश

गल्ली-बोळातील कॅमेरे हॅक, मोबाईल नेटवर्कवर हॅकर्सचा ताबा, कसे सीसीटीव्ही बनले धोकादायक जासूस ?

गल्ली-बोळातील कॅमेरे हॅक, मोबाईल नेटवर्कवर हॅकर्सचा ताबा, कसे सीसीटीव्ही बनले धोकादायक जासूस ?

नवी दिल्ली : Ali Khamenei Death – लय दिवसांपासून ज्याची कुणकुण लागली होती, तो राडा अखेर झालाच! इस्रायलने आणि अमेरिकेने गनिमी कावा वापरून इराणचा ‘सुप्रीम पॉवर’ म्हणजेच अयतुल्ला अली खामेनेई याचा पार पत्ता कट केलाय. शनिवारी जो काय धडाका झाला, त्यात खामेनेईचा खेळ खल्लास झालाय.

डोळ्यात तेल घालून ‘वॉच’ ठेवला होता!
हे काय आज-कालचं प्लॅनिंग नव्हतं. इस्रायलच्या ‘मोसाद’वाल्यांनी लय भारी डोकं लावलं होतं. तेहरानच्या गल्ली-बोळातले सीसीटीव्ही कॅमेरे त्यांनी आधीच आपल्या खिशात टाकले होते. इराणला वाटत होतं कॅमेरे आमचे आहेत, पण त्याचं ‘लाईव्ह शूटिंग’ थेट इस्रायलच्या कार्यालयात चालत होतं. कोणाचं पोरगं कुठं जातंय आणि कोणाचा फोन कुणाला लागतोय, यावर इस्रायलने ‘फिक्सिंग’ लावलं होतं.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

एक छोटी चूक अन् खामेनेईचा ‘काटा’ निघाला!
खामेनेईला २२ फेब्रुवारीलाच वास आला होता की आपलं काहीतरी खरं नाही. सुरक्षारक्षकांनी सांगितलं होतं, “महाराज, जागा बदला, जरा लपून बसा.” पण खामेनेई म्हटला, “काय होत नाही, सगळं नॉर्मल ठेवा.” हीच त्याची ‘ओव्हर कॉन्फिडन्स’ची नड ठरली!

Whatsapp Group Join
Telegram channel Join

इस्रायलने काय केलं? त्यांनी खामेनेईच्या रोजच्या सवयी टिपल्या. बॉडीगार्ड कधी बदलतात, गाडी कुठं लागते, चहा कधी पितात – या सगळ्याचा त्यांनी ‘पॅटर्न’ बनवला. २८ तारखेला दिवसाढवळ्या जेव्हा खामेनेई आपल्या खास शिलेदारांसोबत मिटिंगला बसला होता, नेमकी तीच वेळ साधून इस्रायलने असा काय ‘बॉम्ब’ टाकला की खामेनेईसह अख्ख्या फौजेचा कार्यक्रमच आटोपला!

‘दिवसा’ का निवडला? सीआयएचा खतरनाक गेम!
अमेरिकेच्या CIA ने एक लय भारी टीप दिली होती. ते म्हणाले, “रात्री नको, दिवसा वार करा!” कारण खामेनेईला वाटायचं दिवसा आपण लय सुरक्षित आहोत. याच बेसावधपणाचा फायदा घेत शनिवारी सकाळीच त्याचा गेम झाला. या धडाक्यात खामेनेईसोबत त्याचे जिवलग अधिकारी आणि घरची माणसंही खलास झालीत.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button