Tech

तुमचा स्मार्टफोन लवकर चार्ज होत नाही ? या भन्नाट टिप्स वापरा,आता लवकर होईल मोबाईल चार्ज

तुमचा स्मार्टफोन लवकर चार्ज होत नाही ? या भन्नाट टिप्स वापरा, लवकर होईल मोबाईल चार्ज

How to charge Smartphone Faster : स्मार्टफोन आज आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. दिवसातून किती टास्क आणि किती वेळा स्मार्टफोन वापरतो माहीत नाही. स्मार्टफोनचा वापर योग्य पद्धतीने आणि गरजेनुसार केला तर ते उत्तम गॅझेट आहे. स्मार्टफोनला सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्यवस्थित काम करण्यासाठी त्याची बॅटरी खूप महत्त्वाची असते.

5000 ते 6000 mAh बॅटरी असलेले फोन आज बाजारात येत आहेत. मात्र, अजूनही असे अनेक स्मार्टफोन आहेत ज्यात आजही फास्ट चार्जरची सुविधा उपलब्ध नाही. विशेषत: 10,000 रुपयांच्या रेंजमध्ये येणाऱ्या फोनमध्ये साधारणपणे 18W किंवा 22W चा चार्जर उपलब्ध असतो. अशा परिस्थितीत महागड्या स्मार्टफोनच्या तुलनेत हे फोन हळू चार्ज होतात. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही तुमचा स्मार्टफोन लवकर चार्ज कसा करू शकता.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

लाईट आल्यानंतर मोबाईल फोन झटपट चार्जिंग देखील होत नाही. जर आपला स्मार्टफोन चार्ज होण्यासाठी जास्त वेळ घेत असेल तर, या काही टिप्सचा वापर करून पाहा. या टिप्समुळे अवघ्या काही मिनिटात स्मार्टफोन चार्ज होईल(How to Charge Your Android Phone Faster).

टर्बो चार्जरचा वापर करा

Whatsapp Group Join
Telegram channel Join

स्मार्टफोन जलद गतीने चार्ज करण्यासाठी टर्बो किंवा वेगवान चार्जरचा वापर करा. यामुळे सामान्य चार्जरच्या तुलनेत या वेगवान चार्जरमुळे स्मार्टफोन लवकर चार्ज होईल.

डार्क मोडचा वापर करा

डार्क मोडला चालू ठेवल्याने फोनची बॅटरी कमी खर्च होते. यामुळे स्मार्ट फोनचे ब्राईटनेस ही नियंत्रणात राहते. ज्यामुळे स्मार्टफोन वेगाने चार्ज होतो. डार्क मोडमध्ये फोनची स्क्रीन आणि अॅप्लिकेशन डार्क थीममध्ये दिसते. यामुळे बॅटरी कमी खर्च होते.

अनावश्यक अॅप्स बंद करा

अनावश्यक अॅप्स जास्त बॅटरी खर्च करते. जे वापरण्यात येत नसतील त्या अनइन्स्टॉल करा. जेणेकरून इतर अॅप्सवर बॅटरी खर्च होणार नाही. अॅप्सला बॅकग्राउंडमध्ये चालवण्याची गरज नाही. अनावश्यक अॅप्स बंद केल्यास स्मार्टफोन लवकर चार्ज होण्यास मदत मिळते.

वायरलेस चार्जिंगचा वापर करा

जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा असेल तर, त्याचा वापर करा. या चार्जरमुळे स्मार्टफोन जलद गतीने चार्ज होतो. आपण स्मार्टफोनला चार्जिंग पॅडवर ठेवून चार्ज करू शकता.

एअरप्लेन मोडचा वापर करा

स्मार्टफोन झटपट चार्ज व्हावा, यासाठी चार्ज करताना फोन एअरप्लेन मोडमध्ये चालू करा. एअरप्लेन मोडमध्ये फोनच्या सर्व नेटवर्कचे कनेक्सन बंद केले जाते. यामुळे बॅटरी कमी खर्च होते. तसेच स्मार्टफोन झटपट चार्ज होण्यास मदत मिळते.

चार्ज करताना स्मार्टफोन वापरू नका

जर तुम्ही चार्जिंगच्या वेळीही स्मार्टफोन वापरत असाल, तर स्मार्टफोनची बॅटरी खूप हळू चार्ज होते. जर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन लवकर चार्ज करायचा असेल, तर, चार्जिंग करताना स्मार्ट फोन वापरू नका.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button