युनियन बँकने ओढून आणलेली 2023 मॉडेल मारुती Ertiga CNG फक्त 5 लाख 25 हजारात खरेदी करण्याची सुवर्णसंधी
Union Bank of India Ahilyanagar कडून 2023 मॉडेलच्या Maruti Ertiga CNG चा जाहीर लिलाव आयोजित केला आहे. ऑन-रोडपेक्षा निम्म्याहून कमी किमतीत ही कार खरेदी करण्याची नामी संधी आहे.

वेगवान न्यूज / लेखक : ऋषिकेश गांगुर्डे
मुंबई : जर तुम्ही कौटुंबिक वापरासाठी किंवा ट्रॅव्हल्स व्यवसायासाठी परवडणारी 7-Seater CNG car शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी समोर आली आहे. आता बँकेने जप्त केलेली कार अत्यंत स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. Union Bank of India च्या Ahilyanagar (अहमदनगर) प्रादेशिक कार्यालयाकडून 2023 मॉडेलच्या Maruti Ertiga car चा जाहीर लिलाव आयोजित केला जात आहे.
नेमके बँकेने जप्त केलेल्या गाड्या म्हणजे काय?
नवीन car खरेदी करताना ग्राहक सहसा बँक किंवा पतसंस्थेकडून कर्ज घेतात. पुढे जाऊन काही ग्राहकांची आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे कर्जाचे हप्ते थकतात. वारंवार बँकेकडून नोटीस पाठवूनही थकबाकी न भरल्यास बँक आपले नुकसान भरून काढण्यासाठी वाहन जप्त करण्याचा निर्णय घेते. यानंतर उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी बँक त्या वाहनाचा लिलाव करते. त्यामुळे सध्या September 2023 मॉडेलची Maruti Ertiga car थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने लिलावात काढली असून, बाजारातील चालू दरापेक्षा खूपच कमी किमतीत उत्तम स्थितीतील गाडी खरेदी करण्याची ही नामी संधी आहे.
वाहनाचा सविस्तर तपशील
-
गाडीचे मॉडेल: ERTIGA VXI (O) CNG
-
गाडीचा रंग: पर्ल आर्कटिक व्हाईट (Pearl Arctic White)
-
उत्पादन महिना/वर्ष: सप्टेंबर २०२३ (09/2023)
-
गाडीचा नोंदणी क्रमांक: MH 45 AU 2659
-
चेसिस नंबर: MA3BNC62SPJ680630 | इंजिन नंबर: K15CN9333870
अर्टिगा VXi (O) CNG चे प्रमुख फिचर्स आणि मायलेज
1) इंजिन आणि पॉवर: यात १.५-लीटर K15C ड्युअल जेट इंजिन मिळते. सीएनजी मोडवर हे इंजिन ८७.८3 PS पॉवर आणि १२१.५ Nm टॉर्क जनरेट करते.
2) मायलेज: अर्टिगा सीएनजीचे कंपनी क्लेम केलेले मायलेज २६.११ किमी प्रति किलो एवढे जबरदस्त आहे. लांबच्या प्रवासात यामुळे इंधनाचा खर्च खूपच कमी येतो.
मुख्य फिचर्स:
1) ड्युअल-टोन आतील लेआउट (Dashboard)
2) चारही पॉवर विंडो आणि रिमोट सेंट्रल लॉकिंग
3) मागच्या पॅसेंजर्ससाठी स्वतंत्र एसी व्हेंट्स (Rear AC Vents)
4) स्टीअरिंग माऊंटेड ऑडिओ कंट्रोल आणि इन्फोटेनमेंट सिस्टम
5) सुरक्षेसाठी ड्युअल एअरबॅग्स, ABS सोबत EBD, आणि रियर पार्किंग सेन्सर्स
लिलावातील किंमत आणि नवीन कारशी तुलना
-
लिलावाची राखीव किंमत (Reserve Price): ₹५,२५,०००/-
-
अनामत रक्कम (EMD): ₹५२,५००/-
-
नवीन कारची शोरूम किंमत: सध्या बाजारात नवीन Ertiga VXI (O) CNG ची ऑन-रोड किंमत सुमारे १२.५० ते १३ लाख रुपये आहे. सप्टेंबर २०२३ चे अवघ्या ३ वर्षे जुने मॉडेल तुम्हाला निम्म्यापेक्षा कमी किंमतीत (५.२५ लाखांच्या बेस प्राईसवर) मिळत असल्याने हा एक मोठा फायदा ठरू शकतो.

अधिकृत बॅकेंची जाहिर नोटीस
या लिलावातून गाडी घेण्याचे फायदे आणि तोटे
फायदे:
-
मोठी बचत: नवीन गाडीच्या तुलनेत जवळपास ५०% ते ६०% पैशांची थेट बचत होते.
-
उत्कृष्ट रीसेल व्हॅल्यू: भारतात अर्टिगा सीएनजीला सेकंड हँड मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे.
-
कमर्शियल व पर्सनल वापर: ही ७-सीटर गाडी स्वतःच्या कुटुंबासाठी किंवा ओला/उबर/ट्रॅव्हल्स व्यवसायासाठी वापरून चांगला उत्पन्न मार्ग तयार करता येतो.
-
कमी रनिंग कॉस्ट: सीएनजी इंजिनमुळे प्रति किलोमीटर प्रवासाचा खर्च खूप कमी येतो.
तोटे / काय काळजी घ्यावी:
-
बूट स्पेसची कमतरता: सीएनजी टँकमुळे मागे सामान ठेवण्यासाठी जागा (Boot Space) खूपच कमी मिळते.
-
गाडीची स्थिती चेक करणे गरजेचे: लिलावातील गाडी ‘जशी आहे तशी’ (As is where is) या तत्त्वावर विकली जाते. त्यामुळे गाडी खरेदीपूर्वी मेकॅनिककडून तिची इंजिन आणि बॉडी कंडिशन तपासून घेणे गरजेचे आहे.
-
रोख पैशांचे नियोजन: लिलाव जिंकल्यास बँकेच्या नियमांनुसार ठरलेल्या वेळेत पूर्ण रक्कम जमा करावी लागते.
लिलावाचे वेळापत्रक आणि संपर्क
-
लिलावाची तारीख: २४ ऑगस्ट २०२६
-
लिलावाची वेळ: दुपारी ०३:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत
-
अर्ज भरण्याची शेवटची तारीख: २४ ऑगस्ट २०२६
-
सेवा पुरवठादार: BAANKNET
गाडीची थेट पाहणी करण्यासाठी किंवा लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, अहिल्यानगर येथे संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी बँकेचे प्रतिनिधी श्री. जितेंद्र मांडगे (मोबाईल: 9527972231) यांच्याशी संपर्क साधता येईल. कम बजेटमध्ये मोठी ७-सीटर सीएनजी कार घेणाऱ्यांसाठी ही नक्कीच फायदेशीर डील ठरू शकते.





