चांगल्या पैशाचे आमिष दाखवून झोमॅटो कंपनीने रायर्डंसला दाखवले गाजर…
चांगल्या पैशाचे आमिष दाखवून झोमॅटो कंपनीने रायर्डंसला दाखवले गाजर...

नाशिक – लोकांची पोट भरणारे झोमॅटो रायडर्स यांना आता स्वतःचे पोट भरण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. अक्षरश: दिवस भर ऑनलाईन काम करूनही ही पेट्रोलचे पैसे निघत नसल्याने रायटर्सवर उपास मारीची वेळ आली आहे.ऐकीकडे कंपनी 10 मिनिटात जेवन पोहचविण्याचे आश्वसन ग्राहकांना देत आहे. मात्र जिव धोक्यात घालणा-या रायडर्सचे रेट कार्ड ( पैसे ) कमी करुन पाठीत खजीर खुपसला आहे.
जेव्हा नाशिक शहरात झोमॅटाने आपले प्रस्थ वाढविण्यासाठी अगोदर चार वर्षापुर्वी 35 ( 25 + 10 रेटींग ) रुपये प्रमाणे देवू केले आणि सध्या पेट्रोलचे भाव वाढतच चालले असतांना 25 रुपये प्रमाणे पैसे देत आहे.त्यामुळे आपले खर्च कसे काढवा असा प्रश्न रायडर्स समोर उपस्थित झाला आहे.
सदर झोमॅटो कंपणीने गिग्स बंद करुन जुन्या पद्धतीने रेट कार्ड द्यावे यासाठी नाशिक रायडर्सने काम बंद अंदोलन सुरु केले आहे.
गिग्स हटाओ रेट कार्ड लाओ या मागणीसाठी झोमाटो रायर्डसने ऑल झोन, नाशिकचे मा छगनरावजी भुजबळ ,
( अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री नाशिक) आपले निवेदन पुर्वी प्रमाणे रेड कार्ड करण्याची मागणी केली आहे.
यावेळी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी झोमॅटो कंपणीचे सहका-यांना फोनवरुन विचारपुस करुन दोन दिवसात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले आहे.
काय आहे प्रमुख मागण्या…
१. नाशिक मध्ये गिग्स नको.
२. स्लॉट बुकींग चुकीच्या पदधतीची आहे.
३. स्लॉट कॅन्सल केल्यास फी लागते.
४. गिग्स मध्ये पिकअप व वेटींग टाईमचा पैसा मिळत नाही.
५. प्रत्येक ओर्डचा पेमेंट कसा मिळतो याबद्दल महिती नाही व कंपनी सुदधा या बाबत रायर्डसला
कल्पना देत नाही.
६. पेट्रोलच्या वाढत्या किंमती व महागाई मुळे गिग्स मधुन मिळणारा वेतन पुरेसा नाही.
७. कंपनी ने आणलेले नविन गिग्स या बददल पुर्ण कल्पना ना देता सुरवातीचे काही दिवस ऑर्डर
रेट चांगले देऊन रायर्डसला आमिष दाखवुन रेटकार्ड मधुन गिग्स मध्ये कन्व्हर्ट केले व नंतर
पेमेंट कमी केले.
८. कोरोना काळात या अजाराच्या वाढत्या प्रसारात झोमाटो रायर्डस नी कोणत्याही प्रकाराची पर्वा
न करता कंपनी सोबत उभे राहुन ग्राहकांना सेवा पुरवली व आता कंपनी म्हणते परवडत नसेल
तर सोडून दया.
१४ – १५ तास काम करुनही गिग्स मधुन पैसा मिळत नाही जे रेटकार्ड मध्ये मिळत होता.
टीम लिडर व रायडर सपोर्ट टिमसुदधा लक्ष देत नाही.
कंपनी विरोधात अंदोलन करण्याआधीच काही रायर्डसचे आय.डी कंपनीने बंद केले. या सर्व वरील बाबी झोमाटो रायर्डसाठी अन्याय कारक आहे. या करणामुळे नाशिक मध्ये गिग्स सिस्टम नको आहे. पुर्वी प्रमाणे आम्हाला रेटकार्ड करून देणे. जो पर्यंत वरील बाबी मान्य होत नाही तो पर्यंत झोमाटो नाशिक ऑल झोन बंद रहणार.