पुण्यात व्हाट्सॲपवर तरुणींचे फोटो पाठवून करायचे हे काम ! पुढं काय घडलं !

पुण्यात व्हाट्सॲपवर तरुणींचे फोटो पाठवून करायचे हे काम ! पुढं काय घडलं !

For you

पिंपरी – देशात अत्याचाराच्या व गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या आहे.आता पुन्हा शहरातील वेश्या व्यवसायाचा सुळसुळाट सुरु असल्याची समोर आली आहे.

मात्र आता या शहराच्या विविध भागात मोठ्याप्रमाणात रॅकेट चालवणा-यांवर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) सामाजिक सुरक्षा पथकाची (Social Security Squad)नजर असून, अनेकदा याची भांडाफोडही पोलिसांनी केली आहे. अश्यातच व्हाट्सॲपवर तरुणींचे फोटो पाठवून ऑनलाइन (online) वैश्या रॅकेट चालवणाऱ्या तिघांचा विरोधात सामाजिक सुरक्षा पथकाने भांडाफोड केली आहे.

या तिघांवर गुन्हा दाखल केला असून तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. या रॅकेटमधील तरुणीनीची सुटका पथकाने केलीआहे. यामध्ये प्रामुख्याने दिल्ली आणि छत्तीसगढ येथील तरुणींची समावेश होता.

पोलीसांनी कशी केली कारवाई ?
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथक सातत्याने शहरातील वेश्या व्यवसाय करणाऱ्यांवर नजर ठेवून आहे. अनेक ठिकाणी कारवाई करत वेश्या व्यवसाय उधळून लावले आहेत. अशाच प्रकारे चिंचवड येथील कामिनी हॉटेलमध्ये ऑनलाईन पद्धतीने वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती त्यांना मिळाली. यामध्ये पीडित तरुणीचे व्हाट्सॲपवर फोटो पाठवून वेश्या व्यवसाय केला जात होता.

watch

समोरील व्यक्तीला ज्या मुलीचा फोटो आवडेल तिला जबरदस्तीनं हॉटेलमध्ये पाठवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता. या प्रकरणी पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे. कामिनी हॉटेल मधून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. यामधील पीडित तरुणीची सुटका करण्यात आली. ऑनलाईन पद्धतीनं वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या जॅक नावाच्या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

watch

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button