Uncategorized

कांद्याचे भाव का कमी होताय… पुढे कांद्याचे भाव वाढणार का ? काय असेल मार्केट…

कांद्याचे भाव का कमी होताय... पुढे कांद्याचे भाव वाढणार का ? जाणून घ्या सविस्तर

लासलगाव ; यंदा नाशिक जिल्ह्यात अगोदर पोळ कांदे उत्पादन कमी निघाल्याने शेतक-याना जास्तीच्या बाजार – भावाचा लाभ घेता आला नाही त्यात अतीवष्टीने शेतक-यांच्या कांदे मोठे नुकसान केले होते.मात्र शेतक-याने पुन्हा प्रयत्न करत रागड्या कांद्याची लागवड केली त्या शेतक-यांना उत्पादन मिळाले पण बाजार भाव नसल्याने शेतक-याचे खर्च फिटणार नाही अशी परीस्थिती शेतक-यांसमोर उपस्थित झाली आहे. त्यात कांदा (Onion) कधी वांदा करेल, याचा नेम नसतो. मग तो उत्पादकाचा असो की खाणाऱ्यांचा. कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत दररोज कांद्याच्या बाजार भावात घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

शेतक-याना बाजार भाव मिळावा यासाठी व्यापाऱ्यांसह लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, आता कंटेनरच्या भाड्यात भरमसाठ वाढ झालीय. त्यामुळे परदेशात कांदा निर्यात (Export) करणाऱ्या व्यापाऱ्यांचे वांदे झालेत. देशांतर्गत गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगालच्या सुखसागर या ठिकाणी लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात येत आहे. राज्यातील लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार पेठेत तसेच नगर, पुणे जिल्ह्यातील चाकण आणि सोलापूर या बाजार समित्यांमध्ये लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याची आवक सुरू झालीय. त्यामुळे कांद्याचे दर घसरतायत.

सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली पाहायला मिळतेय. त्यात लाल कांद्याचे सर्वसाधारण दर 750 रुपयांपर्यंत, तर उन्हाळी कांद्याचे सर्वसाधारण दर 1000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा झालेला खर्चही भरून निघणे मुश्किल झाले आहे.

अशातच आता लाल कांद्याची आवक ही येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसात संपुष्टात येणाची शक्यता वर्तवली जात आहे, तर उन्हाळ कांद्याची मोठी आवक बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी दाखल होणार आहे. उन्हाळ कांद्याची टिकवण क्षमता ही पाच ते सहा महिने राहत असल्याने परदेशात उन्हाळ कांद्याला मोठी मागणी असते.

कुठे होते निर्यात?

परदेशात कांदा पाठवण्यासाठी कंटेनरच्या भाड्यात दुपटीने वाढ झाल्याने कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांचे चांगलेच वांदे झाले आहेत. लासलगाव येथून बांग्लादेश, मलेशिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ, सिंगापूर, इंडोनेशिया, कतार, कुवेत, मॉरिशयस, सौदी अरेबिया, बेहरीन, ओमान, व्हिएतनाम, मालदीव, युनायटेड किंगडम, थायलंड, ब्रुनेई, रशिया, ग्रीस, हाँककाँग, पाकिस्तान, इटली, नेदरलँड्स, सेशल्स, कोमोरेझ, फ्रान्स, केनिया, कॅनडा, स्पेन, युनायटेड स्टेटस आदी देशांसह एकूण 76 देशांमध्ये कांदा निर्यात केला जातो.

परदेशात कांदा पाठविण्यासाठी सध्या किती भाडे?

दुबई येथे कांदा नेणाऱ्या कंटेनरला भाड्यापोटी 2 हजार डॉलर वरून मोजावे लागत होते. आता तेच दर 3 हजार डॉलरवर गेलेत. तर श्रीलंका, सिंगापूर, मलेशियासाठी कंटेनरला 1 हजार 900 डॉलर भाडे मोजावे लागत होते. आता हे भाडे अडीच हजार डॉलरहून अधिक द्यावे लागत आहे.

त्यामुळे परदेशात कांदा कसा पाठवावा, असा मोठा प्रश्न कांदा निर्यातदार व्यापार्‍यांसमोर उभा राहिला आहे. केंद्र सरकारने याकडे लक्ष देत कांदा निर्यातीसाठी 10 टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी कांदा व्यापारी मनोज जैन यांच्यासह इतरांनी केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button