देश-विदेश

विनायक मेटे यांच्या कारला नेमका अपघात झाला कसा ? चालक म्हणतो, तासभर मदत मिळालीच नाही, पोलीस म्हणतात, सात मिनिटात पोहोचलो

विनायक मेटे यांच्या कारला नेमका अपघात झाला कसा ? चालक म्हणतो, तासभर मदत मिळालीच नाही, पोलीस म्हणतात, सात मिनिटात पोहोचलो

नवी मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (vinayak mete) यांचं आज पहाटे अपघाती निधन झालं.

पोलिसांच्या 100 क्रमांकावर नंबर फिरवला, त्याचाही उपयोग झाला नाही. तासभर आम्हाला मदत मिळालीच नाही, असा आरोप मेटेंच्या चालकाने केला आहे. तर, आम्हाला अपघाताची (accident) माहिती मिळताच अवघ्या सात मिनिटात आम्ही घटनास्थळी पोहोचलो, असं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांच्या (police) प्रेस रिलीजमध्ये तसं नमूद केलं आहे. मात्र, पहाटे 5 वाजून 5 मिनिटांनी मेटे यांच्या कारचा अपघात झाल्याचंही पोलिसांच्या प्रेस रिलीजमध्ये नमूद केलं आहे.

विनायक मेटे यांच्या कारला आज पहाटे 5 वाजून 5 मिनिटांनी अफघात झाला. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. आम्हाला अपघाताची माहिती 5 वाजून 58 मिनिटांनी मिळाली. माहिती मिळताच त्याचवेळी म्हणजे पहाटे 5 वाजून 58 मिनिटांनी आम्ही घटनास्थळाकडे रवाना झाला. तसेच 6 वाजून 5 मिनिटांनी आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि 7 वाजून 10 मिनिटांनी कार्यवाही केली, असं पोलिसांच्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे.

गाडीवरील ताबा सुटला?

पहिल्या शक्यतेनुसार मेटे यांच्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्यांची कार दुसऱ्या वाहनावर जाऊन आदळली. त्यामुळे हा अपघात झाला असावा. गाडी दुसऱ्या वाहनावर आदळल्यानेच कारचा चक्काचूर झाला असल्याचं सांगितलं जात आहे.

ट्रकचालकाने कट मारला

विनायक मेटे यांचे चालक एकनाथ कदम यांनी या अपघाताची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका ट्रकने कट मारला. त्यामुळे अपघात झाला. अपघातानंतर त्यांना तासभर मदत मिळाली नाही. मदतीसाठी प्रत्येकाला विनवणी केली. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना हात दाखवला. वाहने थांबावीत म्हणून रस्त्यावर झोपलो. पण कोणीही मदत केली नसल्याचं कदम यांनी सांगितलं.

चालकाला डुलकी लागली?

दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वेगळी शक्यता वर्तवली आहे. विनायक मेटे यांचा रात्रभर प्रवास सुरू होता. सकाळी त्यांना मुंबईत यायचे होते. रात्रभर चालकाने गाडी चालवल्याने कदाचित त्याला डुलकी लागली असावी. त्यामुळे अपघात झाला असावा, असं अजित पवार म्हणाले. कुणाला या प्रकरणात घातपाताची शक्यता वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, असंही पवार म्हणाले.

पोलीस काय म्हणाले?

दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या पंचनाम्यात अपघाताचं नेमकं कारण दिलं आहे. मेटे हे मुंबईकडे दुसऱ्या लेनने जात होते. कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटून पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला ठोकर मारून अपघात झाला, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button