तुमच्या गाडीला हे टायर असल्यास पोलीस ठोकणार वीस हजारांचा दंड
तुमच्या गाडीला हे टायर असल्यास पोलीस ठोकणार वीस हजारांचा दंड

Samruddhi Highway : महाराष्ट्रात गाडी चालवण्यासाठी आरटीओ कडून वारंवार नवीन अपडेट जारी करण्यात येत असतात. नेहमी तुम्ही ऐकले असेल आत्ता वाहन चालवताना टी-शर्ट व चप्पल परिधान केल्यास ट्राफिक पोलीस तुमचे चलन कापणार ही बातमी तुम्ही नेहमी ऐकले असेल. आता तुम्हीही खराब झालेल्या टायरने ड्रायव्हिंग करत असाल तर सावधान व्हा…
वरील इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्या कारला ‘असे’ टायर आहेत,तर महामार्गावर ठोठावला जाऊ शकतो 20 हजारांचा दंड समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी आता आरटीओने पुढाकार घेतला असून वाहनांच्या टायरची तपासणी सुरू केली आहे.
या अपघातांच्या वाढत्या संख्येवर पायबंद घालण्याची मागणी करण्यात येत होती. प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी वेग मर्यादेसह इतर नियम लागू केले आहेत.समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Highway) वापर सुरू झाल्यानंतर वाहनांच्या वाढत्या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात होती.
अति वापर झाल्याने घासलेल्या टायरसह समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या वाहनांवर आरटीओने (RTO) कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी आरटीओने तीन वाहनांवर 20 हजार रुपयांचा दंड (RTO Fine) ठोठावला आहे.
समृद्धी महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) सरसावले आहे. समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत.
आतापर्यंत समृद्धी महामार्गावर झालेल्या प्राणांतिक अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या अपघातांवर आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
यातच घासलेल्या टायरमुळे अपघात होण्याचे प्रमाण असल्याचे दिसून आढळून आले आहे. त्यानंतर आरटीओने घासलेले टायर असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
याअंतर्गत ‘Tred depth Analyzer’ च्या साह्याने टायरची तपासणी सुरू आहे. यातील तीन वाहनांचे टायर जास्त घासलेल्या अवस्थेत समृद्धी महामार्गावर आढळून आले.
या वाहनांवर आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई करीत प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे