किराणा आणण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा गोळी लागून युक्रेनमध्ये मृत्यू , नेमंक काय घडलं !
भारतीय विद्यार्थ्याचा गोळी लागून युक्रेनमध्ये मृत्यू , परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

Ukrain Russia War : रशिया आणि युक्रेन यांच्या युद्ध सुरु झाल्याला आज सहावा दिवस आहे. मात्र आज देशात खळबळ माजवणारी बातमी म्हणावी लागेल. आता युक्रेन-रशियाच्या युद्धातून एक मोठी बातमी समोर आली आहेत. युक्रेनमध्ये गोळीबार झाला.त्यावेळी (Firing) किराणा आण्यासाठी गेलेल्या एक भारतीय विध्यार्थीचा मृत्यू झाला आहे.
अनेकजण युक्रेन सोडून आजुबाजुच्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काही ठिकाणी त्यांची अडवणूक होत आहे. युक्रेनमध्ये रशिया आणि युक्रेनियन सैन्याकडून सतत गोळीबाबत, बॉम्बहल्ले, मिसाईल हल्ले होत आहेत. अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of Foreign Affairs) दिली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. अनेक भारतीय अजून युद्धात युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आतापर्यंत एकाही भारतीयच्या मृत्यूची बातमी समोर आली नव्हती. मात्र आजची ही बातमी खळबळ माजवणारी आहे.
सांगायला अत्यंत दु:ख होतं आहे की, आज सकाळी खारकीव येथील गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालय त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. आम्ही त्याच्या कुटुंबाप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो, असं ट्विट परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी केलं आहे.तसेच यात आतापर्यंत अनेक युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत. यात अनेक युक्रेनच्या सैनिकांचाही मृत्यू झाला आहे.
Ministry of External Affairs says that an Indian student lost his life in shelling in Kharkiv, Ukraine this morning. The Ministry is in touch with his family. pic.twitter.com/EZpyc7mtL7
— ANI (@ANI) March 1, 2022
मूळचा कर्नाटकचा होता विद्यार्थी
आज भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार खरकिव मध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात हा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेला शेखरप्पा ग्यानगौडा नवीन हा एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी होता. नवीन हा मूळचा चलागेरी, कर्नाटक राज्यातील विद्यार्थी आहे.यात अनेक देशातील लोक अडकले आहेत. अमेरिकेने ठणकावूणही रशिया सर्व विरोध झुगारून युक्रेनवर रोज जोरदार हल्ले चढवत आहे. शेखरप्पा ग्यानगौडा नवीनच्या मृत्युने भारताला मोठा धक्का बसला आहे. रशिया युक्रेनच्या युद्धाची झळ साऱ्या जगाला बसत आहे.
किराणा आणयला जाणं जीवावर बेतलं
घमासान युद्ध सुरू असताना किराणा आणायला जाणं नवीनच्या जीवावर बेतलं आहे. त्याच्या कुटुंबियांनी टाहो फोडला आहे. तर देशभरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भारत सरकार यानंतर तातडीने बैठक घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आणखी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. आम्हाला लवकरात लवकर बाहेर काढा अशी याचना सध्या भारतीय विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. रशियाच्या न्युक्लिअर हल्ल्याच्या भीतीने सध्या जग दहशतीखाली आहे. न्युक्लिअर हल्ल्याच्या धमकीने अनेक देशांना धडकी भरली आहे.