व्हिडिओ नाशिक – चांदवडच्या शेंडी डोंगरावरून ट्रेकिंग करताना तिघे ट्रेकर्स कोसळून 2 ठार तर 1 जखमी
नाशिक - चांदवडच्या शेंडी डोंगरावरून ट्रेकिंग करताना तिघे ट्रेकर्स कोसळून 2 ठार तर 1 जखमी
नाशिक : जिल्ह्यातल्या मनमाड जवळील हडबीची शेंडी वर आज धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हडबीची शेंडी वर आज गिर्यारोहकांच्या पथकाला अपघात होऊन तांत्रिक पथकातील दोघेजण दगावले असून एक गिर्यारोहक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
अहमदनगर येथून 8 मुली व 7 मुले असे एकूण 15 जण ट्रेकिंग करण्यासाठी या शेंडीच्या डोंगरावर आले होते. यावेळी ही घटना घडली आहे. अनिल वाघ आणि मयुर मस्के अशी मयतांची नावे आहेत तर प्रशांत पवार असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाकी ट्रेकर्स सुखरूप आहे. रापली, कातरवाडी, मनमाड शहरातील तरुणांनी अन्य 12 ट्रेकर्सची सुखरुप सुटका केली आहे. (Three trekkers fell while trekking to Chandwad, fell from Shendi hill, killing 2 and injuring 1)
सविस्तर वृत्त…
अहमदनगरच्या इंद्रप्रस्त ट्रेकर्स या कमर्शियल ग्रुपच्या वतीने हडबीची शेंडी या सुळक्यावर आरोहण मोहीमेचे आज आयोजिन करण्यात आले होते.या मोहीमेत 15 जण सहभागी झाले होते, त्यात काही मुलींचाही सहभाग होता. दुपारपर्यंत सर्व सहभागींचे यशस्वी आरोहण झाल्यानंतर सर्व सहभागींना खालच्या टप्प्यावर उतरविण्यात आले.
शेवटचे तीघे जण उतरण्याच्या बेतात असताना तांत्रिक पथकाचा प्रमुख अनिल वाघ आणि मयूर मस्के हे दोघे खाली कोसळले, त्यातला एक जण जागीच गतप्राण झाला.
जखमी प्रशांत पवार यास मनमाड येथे उपचारासाठी साठी तातडीने हलविण्यात आले. या अपघाताचे वृत्त कळताच कातरवाडी येथील ग्रामस्थ भागवत झाल्टे, जनार्दन झाल्टे, किरण झाल्टे, समाधान संसारे, सचिन संसारे, दीपक झलटे आदींसह सहकाऱ्यांनी त्वरित हडबीची शेंडी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. ग्रामस्थांनीच राबविलेल्या या बचावकार्यात सर्व सहभागींना संध्याकाळपर्यंत खाली आणण्यात आले होते. मृतांचे शव मनमाड येथे दाखल करण्यात आले असल्याची माहिती गिर्यारोहक प्रवीण व्यवहारे यांनी ‘नासिक ट्रेकर्स’शी बोलताना दिली…