सोन्याचे भाव कडाडले आता ग्रॅममागे द्यावे लागणार एवढे पैसे…
सोन्याचे भाव कडाडले आता ग्रॅममागे द्यावे लागणार एवढे पैसे...

नाशिक : आज मंगळवारी सोन्याचे भाव कडाडले आहे. आज चक्क वर्षातील सर्वाधिक भावाची नोंद करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 48500 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 50500 रुपये नोंदवले गेले.
तर चांदीचे (Silver) दर किलोमागे 65500 रुपये नोंदवले गेले आहेत. यावर 3 टक्के जीएसटी वेगळा असेल, अशी माहिती वर्मा ज्वेलर्स गृपवरून मिळाली आहे.
यंदा लग्न सराईचा चांगला जोर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजून महिनाभर तरी सोन्याचे भाव चढेच राहतील. त्यानंतर भाव उतरू शकतात, असा अंदाजही दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना वर्तवला.
सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर युक्रेन आणि रशियामध्ये तणाव वाढला आहे. त्यांच्यात युद्ध होणार का, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यात महागाईचा उडालेला भडका. यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करायला अनेकजण प्राधान्य देत असल्याचे समजते. त्यामुळे ही भाववाढ होत आहे.
राज्यात प्रमुख शहरातील भाव
नागपूरमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 50510 रुपये नोंदवले गेले, 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46300 रुपये नोंदवले गेले.
औरंगाबादमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 51050, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46800 रुपये नोंदवले गेले.
मुंबई येथे 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 50510 रुपये नोंदवले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46300 रुपये नोंदवले गेले.
पुण्यात आज 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 51000 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46750 रुपये नोंदवले गेले.