टाटा सोलर पॅनल प्राइस लिस्ट, 1 किलोवॅट पासून तर 20 किलोवॅट पर्यंतच्या किंमत, जाणून घ्या संपुर्ण खर्च – tata solar panel list
टाटा सोलर पॅनेल प्राइस लिस्ट, 1 किलोवॅट पासून तर 20 किलोवॅट पर्यंतच्या किंमत, जाणून घ्या संपुर्ण खर्च - tata solar panel list
नवी दिल्ली : tata solar panel list टाटा सोलर भारतातील अग्रगण्य सोलर पॅनेल कंपनी आहे आणि टाटा समुहाची एक विश्वासू कंपनी आहे. टाटा पाॅवर 1911 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी गेली 34 ते 35 वर्षापासून एनर्जी क्षेत्रात कार्यरत आहे. टाटा सोलरने आतापर्यंत 594.25 मेगावॅट सोलर पॅनेल इन्स्टॉल करून भारतातील सर्वात मोठी सोलर इन्स्टॉलेशन कंपनी होण्याचा मान मिळवला आहे. कंपनी उत्तम गुणवत्तेचे सोलर पॅनेल स्पर्धात्मक किंमतीत पुरवते, ज्यामुळे ती सध्या भारतातील सर्वात किफायती सोलर पॅनेल देणारी कंपनी म्हणून ओळखली जाते.
टाटा सोलर पॅनल ची कीमत मात्र ₹28 प्रति वॉट आहे, ज्यामध्ये सर्वसामन्य ग्राहक सहज हे बजट-फ्रेंडली सोलर पॅनल बसवू शकतात. आज आपण टाटाचे सोलर पॅनलची लिस्ट पाहणार आहोत. यात आपण आपल्या गरजे नुसार सोलर पॅनल बसून तुमच्या गरजा पुर्ण करु शकता.
टाटा सोलर पॅनेल

टाटा सोलर पॅनेलची किंमत प्रति वॅट आधारित असते. कमी वॅटेजचे पॅनेल प्रति वॅट जास्त किंमतीत मिळतात, तर उच्च वॅटेजचे पॅनेल प्रति वॅट कमी किंमतीत मिळू शकतात. यात 50 वॉट सोलर पॅनल साठी तुम्हाला 44 रुपये वॅट प्रमाणे पैसे द्यावे लागणार आहे. जर तुम्ही 315 वॅट चे सोलर पॅनल खरेदी केले तर तुम्हाला फक्त 29 वॅट प्रमाणे पैसे द्यावे लागेल. जेवढे कमी वॅटचे सोलर तेवढे जास्त पैसे तुम्हाला द्यावे लगणार आहे याची काळजी घ्या.
टाटा सोलर पॅनेल किंमत यादी (50W ते 315W)
| सोलर पॅनेल मॉडेल | विक्री किंमत (₹) | प्रति वॅट किंमत (₹) |
|---|---|---|
| 50W सोलर पॅनेल | ₹ 2,200 | ₹ 44 |
| 100W सोलर पॅनेल | ₹ 4,400 | ₹ 44 |
| 150W सोलर पॅनेल | ₹ 6,600 | ₹ 44 |
| 160W सोलर पॅनेल | ₹ 6,720 | ₹ 42 |
| 200W सोलर पॅनेल | ₹ 7,800 | ₹ 39 |
| 250W सोलर पॅनेल | ₹ 7,250 | ₹ 29 |
| 265W सोलर पॅनेल | ₹ 7,685 | ₹ 29 |
| 288W सोलर पॅनेल | ₹ 8,352 | ₹ 29 |
| 300W सोलर पॅनेल | ₹ 8,700 | ₹ 29 |
| 315W सोलर पॅनेल | ₹ 9,135 | ₹ 29 |
टाटा सोलर सिस्टम किंमत यादी (1kW ते 20kW)
घरगुती किंवा व्यावसायिक वापरासाठी संपूर्ण सोलर सिस्टमची किंमत खालीलप्रमाणे आहे. यात पॅनेल, इन्वर्टर, बॅटरी, स्टँड आणि इन्स्टॉलेशनचा खर्च समाविष्ट आहे.
| सोलर सिस्टम मॉडेल | विक्री किंमत (₹) | प्रति किलोवॅट किंमत (₹) |
|---|---|---|
| 1kW सोलर सिस्टम | ₹ 70,000 | ₹ 70,000 |
| 2kW सोलर सिस्टम | ₹ 1,40,000 | ₹ 70,000 |
| 3kW सोलर सिस्टम | ₹ 1,95,000 | ₹ 65,000 |
| 5kW सोलर सिस्टम | ₹ 3,00,000 | ₹ 60,000 |
| 6kW सोलर सिस्टम | ₹ 3,60,000 | ₹ 60,000 |
| 8kW सोलर सिस्टम | ₹ 4,80,000 | ₹ 60,000 |
| 10kW सोलर सिस्टम | ₹ 5,80,000 | ₹ 58,000 |
| 15kW सोलर सिस्टम | ₹ 8,00,000 | ₹ 53,333 |
| 20kW सोलर सिस्टम | ₹ 10,40,000 | ₹ 52,000 |
टाटा सोलर पॅनेलचे फायदे
-
विश्वासार्ह ब्रँड: टाटा समुहाशी संलग्न असल्याने उत्पादनावर विश्वास.
-
दीर्घकालीन हमी: पॅनेल्सवर 25 वर्षांची वारंटीची हमी.
-
उच्च कार्यक्षमता: उन्हापासून जास्तीत जास्त ऊर्जा निर्मिती.
-
किफायती किंमत: प्रति वॅट ₹29 पासून सुरू होणारी किंमत.
-
विविध क्षमता: 50W पासून 20kW पर्यंत विविध पर्याय.
टाटा सोलर पॅनेल हा काॅलिटी आणि परवणारी किंमत यांचा उत्तम संगम आहे. जास्तीत जास्त क्षमतेचे सोलर सिस्टम घेतल्यास प्रति वॅट किंमत अकक्षरश: कमी होते. सोलर ऊर्जेकडे वाटचाल करताना टाटा सोलर हा एक विश्वासू आणि शहाणपणाचा निवड ठरू शकते.
अधिकृत लिस्ट – https://www.tatapowersolar.com/rooftops/residential/
सूचना : ह्या किंमती अंदाजे आहेत आणि त्या ठिकाण, इन्स्टॉलेशनची गुंतागुंत आणि बाजारभावानुसार बदलू शकतात. अचूक किंमतीसाठी अधिकृत डीलराशी संपर्क साधावा.




