तुमच्या घराच्या छतावर सोलर लावा, सरकार देत आहे सबसिडी, ऑनलाईन अर्ज करा
तुमच्या घराच्या छतावर सोलर लावा, सरकार देत आहे सबसिडी, ऑनलाईन अर्ज करा

नवी दिल्ली : तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून तुम्ही मोफत वीज मिळवू शकता. सरकार तुम्हाला सोलर पॅनल ( Solar panel subsidy ) बसवण्यासाठी सबसिडी देत आहे. ऑनलाईन अर्ज ( Online Application ) करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला फक्त तुमची वीज कंपनी आणि इतर माहिती द्यावी लागेल. सरकार तुम्हाला प्रति किलोवॅट 18 हजार रुपयांपर्यंत सबसिडी देऊ शकते. या योजनेमुळे तुमचे वीज बिल कमी होण्यास मदत होईल.
घराच्या छतावर सोलर रुफटॉप ( solar panel ruftop ) बसवण्यासाठी केंद्र सरकार अनुदान देत आहे. यासाठी केंद्र सरकारने पीएम-सूर्य घर: मुफ्त बिजली ( PM-Surya Ghar: Muft Bijli Yojana ) योजना सुरू केली आहे. हे एक राष्ट्रीय पोर्टल आहे, जे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. मात्र, हे अनुदान किती आहे आणि त्यासाठी अर्ज कसा करता येईल? तसेच, घरामध्ये सोलर पॅनल बसवण्यासाठी संपर्क कसा साधता येईल? हे सर्व आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत…
योजनेंतर्गत किती अनुदान दिले जाईल
निवासी घरांसाठी अनुदानाची एक निश्चित मर्यादा आहे. त्याअंतर्गत प्रति किलोवॅट 18 हजार रुपये अनुदान दिले जाते. 3 किलोवॅटवर 18 रुपये अतिरिक्त अनुदान दिले जाईल. याशिवाय ३ किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या सोलर पॅनलवर ७८ हजार रुपयांची सबसिडी दिली जाते.
सोलर पॅनलची मासिक किंमत किती आहे?
जर तुमचा मासिक खर्च शून्य ते 159 kWh असेल, तर 1 ते 2 kWh रुफटॉप सोलर पॅनेल तुमच्यासाठी चांगले असेल. 150 ते 300 किलोवॅटच्या मासिक वीज खर्चासाठी, 2 ते 3 किलोवॅट सौर पॅनेल सर्वोत्तम असतील. यासोबतच 300 किलोवॅटपेक्षा अधिक मासिक वीज खर्चासाठी 3 आणि अधिक किलोवॅट सौर पॅनेलची आवश्यकता असेल.
ऑनलाइन अर्ज कसा करावा
सोलर रूफटॉपसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://www.pmsuryaghar.gov.in/ पॅनेलला भेट द्यावी लागेल.
यानंतर तुम्हाला स्वतःची नोंदणी करावी लागेल.
त्यासाठी राज्य, जिल्हा आणि वीज वितरण कंपनीचा तपशील द्यावा लागेल.
त्यानंतर ग्राहक खाते क्रमांक टाकल्यानंतर ( Click for solar rooftop calculator ) तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल.
यानंतर तुम्हाला Next बटणावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुमच्यासाठी एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला वीज वितरण कंपनीचा पत्ता, नाव टाकावे लागेल. यामध्ये संभाव्य प्रकल्प खर्च, अनुदान, संभाव्य ग्राहक वाटा याविषयी माहिती उपलब्ध होणार आहे.
सोलर रूफटॉप कॅल्क्युलेटरसाठी ( Click for solar rooftop calculator ) क्लिक करा हा पर्याय तळाशी दिसेल, त्यावर क्लिक केल्याने तुम्हाला मिळालेल्या अनुदानाची माहिती मिळेल. यामध्ये दि यानंतर तुम्हाला Save & Next पर्यायावर टॅप करावे लागेल.
टीप – सूर्या घर मोफत वीज योजना ही सरकारी योजना आहे. त्याच्या मदतीने देशात हरित ऊर्जेला चालना दिली जात आहे.