MaharashtraTrending News

Rain Update : महाराष्ट्रात पुढील तीन दिवस या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा

Rain Update : महाराष्ट्रात पुढील तीन दिवस या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा

Rain Update : मान्सूनने रविवारी दक्षिण कोकणातील काही भागांसह व दक्षिण मध्य महाराष्ट्रात आगमनाची वार्ता दिली. दरम्यान, येत्या ४८ तासांत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. सिंधुदुर्ग, गोवा, रत्नागिरी व कोल्हापूरचा काही भाग मान्सूनने व्यापला आहे. रत्नागिरी, शिवमोगा, हासन, धर्मपुरी, श्रीहरीकोटा, धुबरी येथून मान्सूनचा प्रवास सुरू आहे. येत्या ४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

येत्या ४८ तासांत मान्सून अरबी समुद्राचा काही भाग, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेशचा काही भाग, दक्षिणमध्य आणि वायव्य बंगालचा उपसागर, ईशान्य भागातील काही राज्य, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि बिहार राज्यात मजल मारण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Biparjoy चक्रीवादळ ने आपली मुंबई नाशिक सह निराशा केली आहे. त्याचे कारन म्हणजे cyclone भोवती जी Vertical wind shear ची upward mobility ती कमी आहे त्यामुळे ते VSCS श्रेणी मधे असले तरी पण पूर्वेला आणि पश्चिमेला त्याने पाऊस किंवा नुकसान केले नाही त्यामुळे हे अरबी समुद्रात ले upward motion ने north direction ला येणारे असे पहिले असे चक्रीवादळ आहे.

मॉडेल आधारित पावसाचा अंदाज असला तरी पाऊस पडण्यास wind स्पीड हे 5 kmph असावे पण सध्या वारे 35 kmph वेगाने वाहत आहे आणि 15 जून ते 17 वारे 30 ते 50 kmph किलोमिटर इतक्या गतीने वाहणार आहेत त्यामुळे अवकाळी पावसास अनुकूल वातावरण असले तरी वारा खूप स्पीड ने असल्याने नाशिक मधे पाऊस नाही आहे पुढील 3 दिवस खूप जोरदार असा वारा आपल्या पश्चिम घाटावर वाहणार आहे उद्या ही 14 जून ला मॉडेल आधारित नाशिक जिल्हयात ठिकठिकाणी पाऊस होईल असे दिसते पण wind वारा कमी हवा तेव्हा पाऊस येईल.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

mumbai Monsoon 2023 : नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रात लवकर येण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवला आहे. वास्तविक, पश्चिम किनारपट्टीवर अनुकूल परिस्थिती असल्याने मान्सूनने गोवा ओलांडून रविवारीच महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग गाठले, मात्र त्यानंतर राज्यात मान्सूनचे वारे पुढे सरकलेले नाहीत.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

मुंबईत मान्सून सुरू होण्याची अधिकृत तारीख 11 जून आहे, परंतु बुधवारी रात्रीपर्यंत शहरात हलका पाऊस सुरूच होता. IMD च्या सांताक्रूझ केंद्र आणि कुलाबा केंद्रात मंगळवारी रात्रीपर्यंत अनुक्रमे 6 मिमी आणि 10 मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत 17 जूनपर्यंत असाच हलका पाऊस पडेल, असे हवामान खात्याने आपल्या ताज्या अंदाजात म्हटले आहे. या पावसाचे कारण अरबी समुद्रात तयार झालेले ‘बिपरजॉय’ हे चक्रीवादळ असल्याचे आयएमडीचे म्हणणे आहे. मात्र, तो मान्सूनपूर्व पाऊस म्हणूनही घेतला जाऊ शकतो.

मुंबईत पाऊस कधी पडणार? (मुंबई हवामान अंदाज)

मुंबईत मान्सूनचा पाऊस सुरू होण्यास आणखी आठवडा लागण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे मान्सून सुरू होण्याची तारीख पुढे ढकलली जात असल्याने चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या यंत्रणेने आर्द्रतेची दिशा वळवली असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे 15 जून किंवा त्यानंतर मान्सून मुंबईत दाखल होऊ शकतो. तर १५ जूनपासून ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर महाराष्ट्रात मान्सूनचे वारे वाहतील. मात्र त्यानंतरही चांगल्या पावसासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. 17 जूनच्या आसपास मान्सून मुंबई आणि पुण्यात दाखल होईल, असा अंदाज एका हवामान तज्ज्ञाने वर्तवला आहे.

मान्सून कुठपर्यंत पोहोचला आहे?

मान्सूनची उत्तर सीमा (NLM) रत्नागिरी, कोप्पल, पुट्टापर्थी, श्रीहरिकोटा, मालदा आणि फोर्ब्सगंजमधून जात आहे. अरबी समुद्रात सक्रिय असलेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे 12 जूनपासून देशात मान्सूनमध्ये कोणतीही प्रगती झालेली नाही, असे हवामान खात्याने म्हटले आहे. म्हणजेच मान्सून स्थिर आहे. 18-21 जून दरम्यान दक्षिण द्वीपकल्प, पूर्व भारत आणि शेजारच्या काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.

आयएमडीचे प्रमुख (आयएमडी मुंबई) सुनील कांबळे यांनी सांगितले की, चक्रीवादळ बिपरजॉय सध्या मुंबईपासून दूर आहे. चक्रीवादळ पोरबंदर 300 किमी अंतरावर आहे. बिपरजॉय 15 जून रोजी दुपारी मांडवी आणि कराची दरम्यान उतरण्याची शक्यता आहे.

मान्सूनचे ताजे अपडेटः १४ जूनपर्यंत मान्सून कुठे पोहोचला, आयएमडीने दिली ही माहिती-

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button