देश-विदेश

राज्यातील या जिल्ह्याला मुसळधार पाऊस झोडपणार ; अनेक भागात ऑरेंज अलर्ट जारी….

राज्यातील या जिल्ह्याला मुसळधार पाऊस झोडपणार ; अनेक भागात ऑरेंज अलर्ट जारी....

मुंबई : राज्यातील शेतक-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून राज्याच्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. दरम्यान पुढील तीन दिवस अशीच स्थिती कायम असणार आहे, अशी अशक्यता हवामान विभागाकडून (Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे. सर्व राज्यात यावर्षी पावसाने (Rain) दमदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी तर मुसळधार पावसामुळे (Heavy rain) जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यात यलो अलर्ट आहे. सध्या पुण्यासह (Pune) मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून, पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक, पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे यंदा गोदावरी नदीला चौथ्यांदा पूर आला आहे. धरण क्षेत्रात देखील जोरदार पाऊस झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भारतात काय आहे परीस्थिती 

मान्सून (Monsoon) आता शेवटच्या टप्प्यात आहे, तरीही हवामान खात्याने (IMD) काही राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा (Rain warning) दिला आहे.

 

 

 

वास्तविक, बंगालच्या (Bengal) उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याच्या शक्यतेमुळे, पुढील तीन दिवस पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंडच्या अनेक भागात हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. यासोबतच आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालयमध्ये पावसाची शक्यता आहे.

आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. एमआयडीनेही या राज्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.

कोकण, गोवा आणि दक्षिण गुजरातमध्येही पावसाची शक्यता आहे. दिल्लीत पावसामुळे वातावरण आल्हाददायक आहे. हवामान खात्याने दिवसभरात दिल्ली आणि आसपासच्या भागात हलका पाऊस आणि सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

दिल्ली आणि आजूबाजूच्या भागातही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेट वेदरच्या मते, उत्तर-पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतातील बहुतेक भागांमध्ये पावसाच्या हालचाली कमी होऊ शकतात.

मेघालय, मणिपूर, मिझोराम, ओडिशा, छत्तीसगड आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये एक किंवा दोन जोरदार सरींसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, ईशान्य भारताचा उर्वरित भाग, उत्तराखंड, दक्षिण गुजरात, अंदमान आणि निकोबार बेटे आणि तेलंगणाच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेश, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, लक्षद्वीप, हिमाचल प्रदेश आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button