देश-विदेश

मोदी सरकार या शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार रुपये टाकणार, तुम्ही अपडेट केलं का ?

PM kisan Samman Nidhi : या शेतकऱ्यांना मिळणार ४ हजार रुपये, तुम्ही अपडेट केलं का ?

PM kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. ही सरकारची अशी योजना आहे, ज्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जातात. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये ट्रान्सफर केले जातात. सरकार हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये पाठवते. म्हणजेच केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यात 2,000 हजार रुपये हस्तांतरित करते.

या योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारने आतापर्यंत 10 हप्त्यांमध्ये पैसे पाठवले आहेत. त्याचा पुढील हप्ता एप्रिल महिन्यात येणे अपेक्षित आहे. मात्र आता नवीन नियमांनुसार ई-केवायसी करणे आवश्यक असणार आहे. तसे न केल्यास त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही.

अशा परिस्थितीत, तुम्हाला 11व्या हप्त्याचे पैसे मिळवायचे असतील, तर 31 मार्च 2022 पूर्वी ई-केवायसी (पीएम किसान योजना ई-केवायसी) पूर्ण करा. अन्यथा, त्याशिवाय एप्रिल-जुलैचा 2000 रुपयांचा हप्ता खात्यात येणार नाही. शेतकरी स्वतःही ई-केवायसी करू शकतात. जर मोबाईल नंबर आधारशी लिंक असेल तर पीएम-किसानच्या वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसीचा पर्याय निवडावा लागेल.

पोर्टलवर त्यांच्याकडून आधार क्रमांक विचारला जाईल. पोर्टलवर दिसणारा इमेज मजकूर भरल्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. ते भरा आणि Get OTP वर क्लिक करा. शेतकऱ्याच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवला जाईल, जो पोर्टलवर भरला जाईल आणि सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल. जर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल, तर त्याला जन सुविधा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक ई-केवायसी करून घ्यावे लागेल.

या शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार..

नवीन वर्षाच्या सुरुवातीसह 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांना या योजनेच्या 10 व्या हप्त्यापैकी 2000 रुपये मिळाले. आता लवकरच PM किसान योजनेअंतर्गत 11 वा हप्ता येणार आहे. अशा परिस्थितीत, योजनेच्या लाभार्थ्यांना विशेष संधी आहे आणि त्यांना यावेळी 4000 रुपये मिळू शकतात.

जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत, परंतु अद्याप अर्ज करू शकलेले नाहीत, त्यांना ही संधी दिली जाईल. जर नवीन शेतकऱ्यांनी 31 मार्च 2022 पूर्वी PM किसान योजनेसाठी स्वतःची नोंदणी केली तर त्यांना दोन हप्त्यांचे पैसे मिळतील. म्हणजेच, त्यांना 11व्या हप्त्यात एकूण 4,000 रुपये तसेच दहाव्या हप्त्यासाठी 2,000 रुपये मिळू शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button