अखेर PM किसानचा हप्ता या तारखेला येणार…2000 रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
अखेर PM किसानचा हप्ता या तारखेला येणार...2000 रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

PM किसान 12वा हप्ता ( PM Kisan 12th Instalment ) : शेतकरी PM किसान सन्मान निधीच्या 12व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या हप्त्यातील दोन हजार रुपये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायचे आहेत. सरकारने ठरवून दिलेली ई-केवायसीची अंतिम मुदतही संपली आहे. ३१ ऑगस्टपर्यंतही अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी होऊ शकली नाही.
5 सप्टेंबरपर्यंत पैसे येतील!
पीएम किसान योजनेची माहिती देताना प्रधान सचिव डॉ. अरुण कुमार मेहता म्हणाले की, 12 वा हप्ता फक्त आधारशी जोडलेल्या खात्यात हस्तांतरित केला जाईल. ते म्हणाले की, 5 सप्टेंबरपर्यंत योजनेशी संबंधित रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणे अपेक्षित आहे. या वेळी सरकारचे मुख्य लक्ष अपात्र लाभार्थ्यांना दिले जाणारे लाभ थांबवणे आणि पैसे वसूल करणे हे आहे.
वर्षाला 6 हजार भेटतात
शेतकऱ्याची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात, जे 2-2 हजाराच्या तीन हप्त्यांमध्ये उपलब्ध आहेत.
या वेळी ई-केवायसी पूर्ण झाल्याशिवाय हप्ता दिला जाणार नाही, असे सरकारकडून यापूर्वी सांगण्यात आले होते.
केंद्र सरकारने जेव्हापासून या योजनेसाठी ई-केवायसी आवश्यक केले आहे, तेव्हापासून या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर 2021 दरम्यान, 11.19 कोटी शेतकऱ्यांना 9वा हप्ता मिळाला.
त्यानंतर डिसेंबर 2021 ते मार्च 2022 दरम्यान सुमारे 11.15 कोटी शेतकऱ्यांना 10 वा हप्ता मिळाला. 11 व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या 10.92 कोटींवर आली आहे.