ज्यांना कोणी कर्ज देत नाही त्यांनी या लोन टिप्स वापरा, एका झटक्यात बॅंका देईल तुम्हाला लोन
ज्यांना कोणी कर्ज देत नाही त्यांनी या लोन टिप्स वापरा, एका झटक्यात बॅंका देईल तुम्हाला लोन
नवी दिल्ली : Personal Loan Tips अचानक आलेल्या आर्थिक गरजा, जसे की वैद्यकीय आणीबाणी, घरदुरुस्ती किंवा लग्नाचा खर्च, यासाठी अनेक लोक मित्र किंवा नातेवाईकांकडे पैसे मागण्यास संकोचतात. अशा वेळी पर्सनल लोन हा एक मोठा आधार बनू शकतो. गेल्या काही वर्षांत फिनटेक कंपन्यांच्या आगमनाने पर्सनल लोन घेणे खूप सोपे झाले आहे, पण या कंपन्यांचे व्याजदर खूप जास्त असतात आणि त्यांच्या नियम-अटीही त्यांच्या फायद्याच्या असतात. म्हणूनच फिनटेक कंपन्यांऐवजी मोठ्या सरकारी आणि खासगी बँका किंवा एनबीएफसीकडून पर्सनल लोन घेणे योग्य ठरते. जर तुम्हाला मोठ्या बँकांकडून पर्सनल लोन पटकन घ्यायचा असेल, तर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल.
१. चांगला क्रेडिट स्कोर (CIBIL स्कोर)
आज पर्सनल लोन मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे चांगला क्रेडिट स्कोर. तुमचा स्कोर ७५० किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास बँका लोन देताना प्राधान्य देतात. नियमितपणे तुमचा क्रेडिट स्कोर तपासत राहा. कधीकधी एखाद्या चुकीच्या रेकॉर्डमुळे स्कोर कमी होतो, त्याची तक्रार क्रेडिट रेटिंग एजन्सीकडे करून तो दुरुस्त करता येतो.

२. नियमित उत्पन्न
बँका आणि एनबीएफसी अशा लोकांना पर्सनल लोन देण्यास प्राधान्य देतात, ज्यांचे उत्पन्नाचे स्रोत नियमित असतात. खासकरून नोकरी करणाऱ्या लोकांचे लोन अर्ज त्ये झटकन मंजूर करतात. यचे कारण असे की नोकरीधारकांच्या बँक खात्यात दरमहा पगार येतो, ज्यामुळे त्यांना हप्ते भरण्यास अडचण येत नाही. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी उत्पन्न स्थिर असावे हे महत्त्वाचे आहे.
३. कमी इनकम-डेट रेशो (कर्जाचा दबाव कमी)
तुमचे उत्पन्न आणि सध्याच्या कर्जाच्या हप्त्यांचे गुणोत्तर (Income-Debt Ratio) कमी असल्यास पर्सनल लोन मिळवणे सोपे जाते. बँका अशा लोकांना लोन द्यायला प्राधान्य देतात, ज्यांच्यावर आधीच्या कर्जाचा ओझा जास्त नसतो. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा मासिक पगार ₹१ लाख असेल आणि त्याला इतर कर्जावर दरमहा ₹४०,००० हप्ते भरावे लागत असतील, तर त्याचे इनकम-डेट रेशो जास्त मानले जाईल आणि नवीन लोन मंजुरी अडचणीची शक्यता आहे.
४. बँकेसोबत चांगले संबंध
एखाद्या बँकेसोबत चांगले आणि दीर्घकालीन संबंध असणे फायद्याचे ठरते. जर तुमचे बचत खाते, फिक्स्ड डिपॉझिट, इन्शुरन्स यासारख्या सर्व आर्थिक उत्पादने एकाच बँकेतून घेतली असतील, तर बँका तुमच्या आर्थिक स्थितीवर विश्वास ठेवते. लोन घेऊन वेळेवर हप्ते भरणाऱ्या ग्राहकांकडे बँका अधिक सहकार्याची वृत्ती दाखवतात. अशा ग्राहकांना लोनची झटपट मंजुरी मिळण्याची शक्यता जास्त असते.
अचानक आलेल्या आर्थिक गरजांसाठी पर्सनल लोन हा एक सोयीस्कर पर्याय आहे. पण फिनटेक कंपन्यांच्या जलद ऑफरपेक्षा मोठ्या आणि विश्वासार्ह बँकांकडून लोन घेणे अधिक सुरक्षित आणि किफायतशीर ठरू शकते. वरील चार टिप्सचा अवलंब करून तुम्ही तुमची लोन मंजुरी होण्याची शक्यता वाढवू शकता आणि चांगल्या अटींवर लोन मिळवू शकता. लोन घेण्यापूर्वी विविध बँकांच्या अटी आणि व्याजदरांची तुलना करणे नक्कीच विसरू नका.

