Uncategorized

आज बारावीचा निकाल ! बारावीचा निकाल येथे चेक करा एका क्लिकवर….

आज बारावीचा निकाल ! बारावीचा निकाल येथे चेक करा एका क्लिकवर....

पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावी परीक्षेचा निकाल ८ जून रोजी (HSC Result Date) जाहीर केला जाणार आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा (12th exam result) ही ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती.

बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडियावर विविध दावे केले जात असतानाच आता बारावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. आज म्हणजे बुधवार ८ जून रोजी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार Maharashtra Board HSC Result Date 2022 Confirmed आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना आता चांगलीच उत्सुकता लागली आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन हा निकाल पाहता येईल.

तत्पूर्वी १४ फेब्रुवारीपासून कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आल्या होत्या. राज्यातील १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाच्या तारखेची घोषणा ट्विटर द्वारे केली.

पुढील संकेतस्थळांवर बारावीचा ऑनलाइन निकाल पाहता येईल – येथे विद्यार्थी खालील लिंक ला क्लिक करून सीट क्रमांक व आईचे नाव प्रविष्ट करून निकाल पाहू शकतात…
1) www.mahresult.nic.in
2) www.hscresult.mkcl.org
3) http://hsc.mahresults.org.in
यावर्षी विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा दिल्या. करोना काळात लिखाणाचा सराव सुटल्याने त्यांना परीक्षेकरिता अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. तसेच काही प्रमाणात अभ्यासक्रमातदेखील कपात करण्यात आली होती.

या विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्ष करोनामुळे ऑनलाइन अभ्यास करावा लागला होता. वर्षाच्या अखेरीस काहीच काळ विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊ लागले होते. त्यामुळे या निकालाची उत्सुकता कायम आहे.

निकालाला अवघे काही क्षण आता शिल्लक राहिल्यानं विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली. दुपारी एक वाजता निकाल जाहीर केले जातील.

त्यानंतर दुपारी चार वाजता निकालांची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. बारावीच्या परीक्षेला एकूण 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी बसले होते. कोणत्या शाखेचे किती विद्यार्थी बसले होते, हे जाणून घेऊयात..

सायन्स : 6लाख 32 हजार 994

आर्ट्स : 4 लाख 37 हजार 336

कॉमर्स : 3 लाख 64 हजार 362

व्यावसायिक अभ्यासक्रम : 50 हजार 202

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button